शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

अवकाळीच्या तडाख्याने कच्च्या विटांचा झाला चिखल; वीटभट्टी चालकांचे लाखोंचे नुकसान

By शिवाजी कदम | Published: November 29, 2023 7:28 PM

अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कच्च्या मालाच्या विटा झाकण्यासाठी मजुरांची मोठी तारांबळ उडाली.

शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथे सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाच्या तडाख्यामुळे शेती पिकांसह वीट उत्पादकांनी बनवलेल्या कच्च्या विटांचा अक्षरश: चिखल झाला आहे.

अंबड तालुक्यातील गोंदी महसूल मंडळामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीच्या तडाख्यातून वीटभट्टी चालक वाचू शकले नाहीत. परिसरात वीट भट्टी चालकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

पावसामुळे विटांचा चिखलपरिसरात जवळपास २० ते ३० वीटभट्ट्या आहेत. प्रत्येक वीटभट्टीवर सुमारे पाच मजूर काम करत आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे वीटभट्टी चालवणाऱ्यांसह येथे काम करणाऱ्या मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळा सुरू झाला की, विटा बनवण्याची लगबग सुरू होते. यासाठी कच्च्या मातीला आकार देऊन तिला विटांमध्ये रूपांतरित केले जाते. यानंतर भट्टी पेटवून त्यावर कच्च्या विटा भाजण्यात येतात. परंतु, कच्च्या विटा लावतानाच अवकाळी पावसामुळे विटांचा चिखल झाला आहे.

हंगाम तोट्यातउत्पादक मजुरांच्या साहाय्याने कच्च्या विटा बनवून त्या वाळवून, भाजून पक्क्या करत असतात. शहागडच्या वीटभट्टी चालकांनी लाखोंच्या संख्येने कच्च्या मालाच्या विटा बनवून वाळण्यासाठी ठेवल्या होत्या. सोमवारी पहाटे अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कच्च्या मालाच्या विटा झाकण्यासाठी मजुरांची मोठी तारांबळ उडाली. पावसामुळे वीटभट्टी चालकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे वीटभट्टी चालकांचा यंदा हंगाम तोट्यात गेला आहे.

शासकीय मदत द्यावीपावसामुळे कच्च्या मालाच्या विटांचा अक्षरशः चिखल होऊन, लाखोंचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने वीटभट्ट्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत मिळवून द्यावी.- वसंत सापटे, अध्यक्ष, वीटभट्टी चालक-मालक संघटना

टॅग्स :RainपाऊसJalanaजालना