जालना : अप्पर पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सुरवदे या वार्षिक तपासणीनिमित्त जालना जिल्हा दौ-यावर आहेत. गुरुवारी त्यांनी पोलीस मुख्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची तपासणी केली.पोलीस दलातील प्रशासकीय कामकाजाची तपासणी करण्यासाठी डॉ. सरवदे या तीन दिवसीय जालना दौ-यावर आल्या आहेत. सकाळी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. सरवदे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील गुन्हे शाखा, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, गुन्हे शाखा, प्रबंधक शाखा, विशेष कृती दल, विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, कार्यालयीन कामकाज शाखा, सीसीटीएनएस आदी विभागांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच पोलीस मुख्यालयातील शस्त्रगाराची पाहणी करून उपलब्ध दारूगोळा व शस्त्रसाठ्याची माहिती घेतली. पोलीस मुख्यालयात राहणा-या अधिकारी व कर्मचा-यांसाठी सुविधा म्हणून तयार करण्यात आलेले वाचनालय, व्यायाम शाळा, वैद्यकीय सुविधा, महिला कर्मचा-यांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेले पाळणाघर यांची पाहणी केली. मोटार परिवहन विभागात उपलब्ध वाहने, त्यांची स्थिती, आवश्यक वाहनांची संख्या इ. बाबत महासंचालकांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेतली. तसेच पोलीस अधिकारी व कर्मचा-यांसाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. या वेळी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संतोष पाटील आदींची उपस्थिती होती.---------आज परेड निरीक्षणअप्पर पोलीस महासंचालक शुक्रवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर परेड निरीक्षक करणार आहेत. या वेळी कर्मचा-यांच्या अडचणीही जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिका-यांची बैठक घेऊन तपास कामांचा आढावा घेतला जाणार आहे.
अप्पर पोलीस महानिरीक्षकांकडून मुख्यालयात तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:43 AM