लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गोवर - रूबेला एकत्रित लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून या आजाराला पोलिओ प्रमाणे हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असून, जालना जिल्ह्यात सहा लाख १५ हजार मुलांना हे लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पैकी ६ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी दोन आठवड्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात शून्य ते ६ वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.जगात या आजाराने मोठे थैमान घातलेले आहे. जगात दरवर्षी या आजारामुळे दीड लाख मुलांचा मृत्यू होतो. तर एकट्या भारतात ५० हजार मुलांचा मृत्यू होत असल्याचे सर्वेक्षण आहे. हा मृत्यूदर कमी करण्यासाठी गोवर-रूबेला ही विशेष लसीकरण मोहिम होती घेतली आहे. देशात यापूर्वी सातेतीन कोटी बालकांना ही लस देण्यात आली असून, देशातील २१ राज्यात हे लसीकरण पूर्ण झाले असून, महाराष्ट्र हे २२ वे राज्य आहे.दरम्यान जालना जिल्ह्यात मंगळवारी या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या ओवी या मुलीला लस देऊन करण्यात आला. जिल्ह्यातील २४१० शाळांमध्ये आज लसीकरण करण्यात आले. ही लस देताना विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.तसेच शाळेतील मुख्याध्यापकांनी यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून सहकार्य केले. दरम्यान काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आम्ही यापूर्वीच ही लस दिल्याचे सांगितले. परुतु तरीही ही लस दुसºयांदा घेल्यावर त्याचे दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्टीकरण उपस्थित वैद्यकीय कर्मचा-यांनी केले.रूबेला हा आजार गर्भवती महिलांमध्ये जास्त करून आढळून येतो.त्यावेळी गर्भातील बाळाला संसर्ग झाल्यास मूल अपंग जन्मते. यामुळे हे लसीकरण महत्वाचे ठरते.जालना : जुळ्या मुलांना लस देऊन शुभारंभजालना येथील महिला व बाल रूग्णालयात अनुक्रमे रूद्रांश आणि देवांश शिंदे या जुळ्यांना गोवर- रूबेला लस देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दोन तासात ७० मुलांना लस देण्यात आल्याची माहिती महिला व बाल रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. एम.एस. पाटील यांनी दिली. यावेळी डॉ. बेदरकर यांच्यासह अन्य परिचारीकांची उपस्थिती होती.
लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:29 AM