लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जैन समाजाचे श्रध्दास्थान असलेले गुरूदेव १००८ श्री गणेशलालजी म.सा. यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त येत्या मंगळवारी शहरातील तपोधाम या स्मृतीस्थळी विविध कार्यक्रम होणार आहेत. या प्रसंगी देशविदेशातून जैन संतांसह भाविकांची उपस्थिती राहणार आहे.जैन बांधवांमध्ये या सोहळ्याची दरवर्षी मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते. या सोहळ्यासाठी देशभरासह विदेशातील भाविक हजारोंच्या संख्येने येथील तपोधाम स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येतात. यंदाही जैन श्रावक संघाच्या नूतन पदाधिका-यांनी जय्यत तयारी केली आहे. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इ. राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. या कार्यक्रमात तपस्वीरत्न प.पू. विवेकमुनीजी, प.पू. सेवाभावी गौरव, प.पू. प्रणव मुनीजी, प.पू. दिलीप कंवरजी, प.पू. प्रमोद सुधाजी, प.पू. उज्जल कंवरजी आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, खा. दिलीप गांधी, आ. राजेश टोपे, आ. चैनसुख संचेती, आ. प्रशांत बंब, आ. सुभाष झांबड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल, ओमप्रकाश पोकर्णा, मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, निखिल ओस्तवाल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत आदी उपस्थित राहणार आहेत. १२ ते १६ जानेवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत गु्रप अंताक्षरी, १४ जानेवारी रोजी ३ ते ५ दृश्य प्रश्नमंच, सायंकाळी ७ ते ९ नाटिका व भक्तिगीत, १५ रोजी सकाळी ७.३० वाजता गुरू गणेश शोभायात्रा व दीक्षार्थी भगिनींची शोभायात्रा, निबंध स्पर्धा, संध्याकाळी सात वाजता एक श्याम गुरू गणेशजी के नाम, भक्तिगीत संध्या कार्यक्रम होईल. १६ रोजी तपोधाम येथे सकाळी ६ वाजता प्रार्थना, ७.३० बाहेरगावाहून आलेल्या पदयात्रींची प्रभातफेरी, सकाळी ८.४५ वाजता रक्तदान, शिबीर, ध्वजारोहण होईल, असे जैन श्रावक संघाचे अध्यक्ष संजय मुथा, उपाध्यक्ष नरेंद्र लुणिया, सचिव स्वरूपचंद ललवाणी, विजयराज सुराणा, डॉ. गौतम रूणवाल, सुदेश सकलेचा, डॉ. धरमचंद गादिया, कचरूलाल कुंकूलोळ, भरत गादिया, डॉ. कांतीलाल मांडोत, सूरजमल मुथा आदींनी केले आहे.
प.पू. गणेशलाल म.सा. पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:34 AM