जालना येथील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे भाव स्थिर आहेत़ विशेष करून फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, बटाटे या भाज्यांना मोठी मागणी आहे़ सध्या बाजारपेठेत कोथिंबीर १४० रुपये शेकडा, टोमॅटो ७० ते १७० रुपये कॅरेट, शिमला मिरची १२० ते १५० रुपये प्रति दहा किलो, फुलकोबी १५ रुपये किलो, पत्ताकोबी १५० रुपयांची दहा किलो, हिरवी मिरची २५ रुपये किलो, भेंडीचे भाव वाढले असून, ३० रुपये किलोने विक्री होत आहे़
अदक्र, लसूण, कांदा आदींचे भाव स्थिर आहेत़ बटाटे १५ ते १६ रुपये किलोने विक्री होत आहेत़ हे भाज्यांचे भाव घाऊक बाजारपेठेतील असून, किरकोळ बाजारपेठेत वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने या सर्व भाज्यांच्या किमतीत साधारणपणे ५ ते १० रुपयांचा फरक पडत आहे़ सध्या बाजारपेठेत जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्यांची मुबलकता आहे़