महाकाळा (अंकुशनगर, जि. जालना) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी साष्टपिंपळगाव (ता.अंबड) येथे ११ दिवसांपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आरक्षणाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साष्टपिंपळगावच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील गावागावात ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा निर्णय शनिवारी आयोजित मराठा संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला, तर यावेळी गत पाच दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. शिवबा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे, संतोष ढवळे, बाबासाहेब वैद्य, मुक्ताबाई ढेपे आदींनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानंतर प्रशासनाने त्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी प्रयत्न केले; परंतु उपोषणकर्ते मागण्यांवर ठाम राहिले. गावातील महिलांनी चक्क गॅससह इतर संसार आंदोलनस्थळी आणला असून, मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार महिलांनीही केला आहे.
साष्टपिंपळगाव येथील राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी राज्यातील मराठा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा, मूक मोर्चाच्या समन्वयकांची बैठक झाली. मराठा आरक्षणाबाबत शासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात आला. शिवाय साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाच्या धर्तीवर राज्यातील गावागावात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच शासन नियुक्त आरक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी साष्टपिंपळगाव येथे येऊन आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेऊन आश्वासन द्यावे. त्यानंतरच हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आला. बैठकीतील चर्चेनंतर पाच दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातील मराठा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
आता मंत्र्यांच्या विरोधात एल्गार : मेटे
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत नोकरभरती स्थगित करावी, अन्यथा जे जे मंत्री आपल्या विभागातील नोकरभरती जाहीर करतील त्यांच्याविरोधात एल्गार आंदोलन केले जाईल. या एल्गार आंदोलनाची सुरुवात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरापासून केली जाणार असल्याचे आ. विनायक मेटे यांनी यावेळी सांगितले.
गावागावात शिवज्योत पेटवा
अनेक मोर्चे निघाले, समाज बांधवांनी बलिदान दिले; परंतु समाज गाफील राहिल्याने आरक्षणासाठी झगडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता गावागावात शिवज्योत पेटवून या आंदोलनास पाठिंबा द्यावा. गत अकरा दिवसांत राज्यात किती आंदोलने झाली, याचा आढावा घेऊन पुढील आंदोलनाचा शब्द द्यावा, असे आवाहन मुंबई येथील समन्वयक प्रशांत सावंत यांनी केले.
आरक्षणाची लढाई अधिक तीव्र करू
आमरण उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांचा जीव गेला तर ते अमर होतील; परंतु आपण जिवंत असूनही मरणासन्न अवस्थेत जाऊ. त्यामुळे आता आरक्षणाच्या लढाईत सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. काही निर्णय चुकू शकतात; परंतु आता हार न मानता आरक्षणाची ही लढाई तीव्र करण्यात येणार असल्याचे पानिपत येथील राम नारायण यांनी सांगितले.
कॅप्शन : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील राज्यव्यापी बैठकीत बोलताना मराठा संघटनांचे पदाधिकारी.
फोटो कॅप्शन
1. साष्टपिंपळगाव येथे उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना आमदार विनायक मेटे व इतर पदाधिकारी. (30जेएनपीएच 46)
2. साष्टपिंपळगाव येथील राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला (30जेएनपीएच 47)
3. साष्टपिंपळगाव येथे आयोजित राज्यव्यापी बैठकीत सहभागी मराठा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य. (30जेएनपीएच 47)
===Photopath===
300121\30jan_1_30012021_15.jpg~300121\30jan_2_30012021_15.jpg~300121\30jan_3_30012021_15.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन1. साष्टपिंपळगाव येथे उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना आमदार विनायक मेटे व इतर पदाधिकारी. (30जेएनपीएच 46)2. साष्टपिंपळगाव येथील राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला (30जेएनपीएच 47)3. साष्टपिंपळगाव येथे आयोजित राज्यव्यापी बैठकीत सहभागी मराठा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य. (30जेएनपीएच 47)~फोटो कॅप्शन1. साष्टपिंपळगाव येथे उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना आमदार विनायक मेटे व इतर पदाधिकारी. (30जेएनपीएच 46)2. साष्टपिंपळगाव येथील राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला (30जेएनपीएच 47)3. साष्टपिंपळगाव येथे आयोजित राज्यव्यापी बैठकीत सहभागी मराठा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य. (30जेएनपीएच 47)~फोटो कॅप्शन1. साष्टपिंपळगाव येथे उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना आमदार विनायक मेटे व इतर पदाधिकारी. (30जेएनपीएच 46)2. साष्टपिंपळगाव येथील राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला (30जेएनपीएच 47)3. साष्टपिंपळगाव येथे आयोजित राज्यव्यापी बैठकीत सहभागी मराठा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य. (30जेएनपीएच 47)