वरूड खुर्द या गावाची लोकसंख्या ९ हजारांच्या जवळपास आहे. गावाला तीन रोहित्रने वीजपुवरठा केला जातो. गावात मागील काही दिवसांपासून रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत महावितरणकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केले गेले. दोन महिन्यांपूर्वीच गावातील तीनही रोहित्र जळाले आहेत. यामुळे गामस्थांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. रोहित्र जळाल्याने पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महिनाभरापूर्वीच तीनही रोहित्र दुरूस्तीसाठी पाठविण्यात आले होते. परंतु, अद्याप त्यांची दुरूस्ती झाली नाही. याबाबत तक्रारी करण्यात आल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गावातील वीजपुरवठा तातडीने सुरूळीत करावा, यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून कनिष्ठ अभियंता प्रशांत गिते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दोन ते तीन दिवसांत रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन गिते यांनी दिले.
मागील दोन महिन्यांपासून गावात अंधार आहे. त्यामुळे गामस्थांची गैरसोय होत आहे. आम्ही महावितरणकडे रोहित्राची वारंवार मागणी केली. परंतु, याकडे दुर्लक्ष केले गेले. येत्या चार दिवसात रोहित्र बसविले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल.
अंकुश गाढे, ग्रामस्थ
ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा
येत्या चार दिवसात रोहित्र बसवले नाही तर ग्रामस्थांच्या वतीने उपोषण केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर पी. एल. गाढे, रमेश गाढे, भाऊसाहेब गाढे, दिनकर रोडगे, संतोष गाढे, प्रदीप गाढे, सुरेश गाढे, पंजाब गाढे, ज्ञानेश्वर गाढे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
===Photopath===
020321\02jan_9_02032021_15.jpg
===Caption===
निवेदन