राणी उंचेगाव येथील रेणुकाई ग्राहक संस्था या स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारकांसाठी येत असलेले प्रत्येक महिन्याचे धान्य हे वेळेत वाटप केले जात नाही. केवळ ठरावीक ग्राहकांनाच धान्य दिले जात आहे. दुकानदाराकडून धान्य संपल्याचे सांगितले जाते. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून, प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या निवेदनावर सुरेश शिंदे, श्रीरंग शिंदे, दिलीप गायकवाड, बाबासाहेब जाधव, संतोष शिदे, संजय काळे, योगेश शिंदे यांच्यासह ५१ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबाबत तलाठी जे.एल. खरजुले म्हणाले की, दुकानदाराला वेळेवर धान्यवाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत दुकानदार दुर्गादास पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक महिन्यात आलेले धान्य ई-पॉस मशीनद्वारे वाटप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
===Photopath===
060321\06jan_28_06032021_15.jpg
===Caption===
निवेदना