लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : भरपावसात सुरू असलेले किनगाव चौफुली ते नांदी रस्त्याचे काम रविवारी दुपारी नांदी ग्रामस्थांनी बंद पाडून आंदोलन केले. या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत अनेक तक्रारी यावेळी ग्रामस्थांनी केल्या.किनगाव चौफुली ते नांदी या ५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.रविवारी या रस्त्याचे काम भरपावसात करण्यात येत होते. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले.यापूर्वीच रस्त्याच्या दर्जाबाबत उपस्थित केलेले प्रश्न आणि भरपावसात सुरू असलेले काम पाहता संतप्त ग्रामस्थांनी रविवारी दुपारी या रस्त्याचे काम थांबवून आंदोलन केले.नियमाचे पालन न करता काम सुरू असून, कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला. नांदी येथील साजीद पटेल, ताहेर पटेल, ज्ञानेश्वर डोंगरे, दीपक सावंत, सय्यद इस्माईल, प्रकाश सावंत, कैसर पटेल, इमरान सय्यद, दिलीप डोंगरे, अब्दुल्ला कुरेशी यांनी काम थांबवून मुकादमाला धारेवर धरले.विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणारकिनगाव चौफुली ते नांदी रस्त्यासह इतर रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी तक्रारी करूनही दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याचे नांदी येथील आंदोलकांनी सांगितले.
पावसात सुरू असलेले काम ग्रामस्थांनी रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:42 AM