शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

भोकरदनमध्ये वाढला मतदानाचा टक्का...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:29 AM

भोकरदन विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन विधानसभा मतदार संघात या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने मतदार संघात सर्वत्र मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढला असून, सरासरी ६९.३१ टक्क्यापर्यंत मतदान झाले.भोकरदन विधानसभा निवडणुकीसाठी ३२२ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. सकाळपासूनच मतदार संघातील मताची टक्केवारी वाढत होती. दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले होते. रात्री आठ वाजेपर्यंत ६९.३१ टक्क्यापर्यंत मतदान झाले आहे.जालना मतदारसंघात शांततेत मतदानजालना : जालना विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान पार पडले. परंतु, वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणी अडचणी आल्या.जालना मतदारसंघात सोमवारी सकाळपासूनच मतदानास सुरुवात झाली. सकाळी पाऊस असल्यामुळे मतदार केंद्रांबाहेर गर्दी नव्हती. मात्र, पाऊस उघडल्यानंतर मतदारांनी मतदान करण्यास पसंती दिली. सकाळी नऊ वाजेपर्यंत सात टक्के मतदान झाले. यानंतर मतदानाची टक्केवारी वाढली. ११ वाजेपर्यंत १८ टक्के तर दुपारी १ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. ३ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर संथगतीने मतदान झाले. पाच वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान झाले. १ लाख ७२ हजार ७२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री आठ वाजेपर्यंत ५४.९० टक्के मतदान झाले.बदनापूर मतदारसंघात ६७़६२ टक्के मतदानबदनापूर : बदनापूर विधानसभा मतदारसंघात पावसामुळे अनेक मतदान केंद्रांवर अडचणी आल्या. मात्र, दुपारनंतर मतदारांनी मतदान करण्यासाठी बुथवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत बदनापूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ८ हजार १३८ मतदारांनी मतदान केले. एकूण ६७.६२ टक्के मतदान झाले.बदनापूर विधानसभा मतदारसंघात सुरूवातीच्या पहिल्या दोन तासात मतदारांनी मतदान करण्यास निरूत्साह दाखविला. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत मतदारसंघात केवळ ६.८३ टक्के मतदान झाले़ त्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी करण्यास सुरूवात केली़ त्यामुळे पुढील दोन तासांच्या मतदानात वाढ झाली. सकाळी ९ ते ११ दरम्यान ४४ हजार ५८८ पुरुष व २० हजार ४२४ महिला अशा एकूण ६५ हजार १२ मतदारांनी मतदान केले.परतूर मतदारसंघात मतदारांचा उत्साहपरतूर : परतूर विधानसभा मतदारसंघात सकाळी पाऊस असल्याने दुपारी १२ वाजेनंतर मतदानाला वेग आला. रात्री आठ वाजेपर्यंत परतूर मतदारसंघात ६७.६६ टक्के मतदान झाले. दरम्यान, १७ व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्या होत्या.परतूर मतदारसंघात सोमवारी सकाळी पाऊस सुरु होता. पावसाचा मोठा परिणाम मतदानावर दिसला. पावसामुळे सकाळी आठ वाजेच्या दरम्यान मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले. आठ वाजेच्यानंतर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. दुपारी १ वाजेपर्यंत ३२. ७२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर मतदारांनी गर्दी केली. त्यामुळे ३ वाजेपर्यंत ४८.७८ टक्के मतदान झाले. रात्री आठ वाजेपर्यंत ६७.६६ टक्के मतदान झाले.३३० मतदान केंद्रांवर ७३ टक्के मतदानघनसावंगी : घनसावंगी विधानसभा मतदार संघातील ३३९ मतदान केंद्रावर सोमवारी शांततेत मतदान झाले. सोमवारी पहाटे पाऊस झाल्यानंतरही सर्वत्र उत्साहात मतदान झाले.घनसावंगी मतदार संघात १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ७ टक्के मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत २१ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३८ टक्के, ३ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले. तर रात्री आठ वाजेपर्यंत ७३.०५ टक्के मतदान झाले.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानjalna-acजालनाpartur-acपरतूरghansawangi-acघनसावंगीbhokardan-acभोकरदनbadnapur-acबदनापूर