लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा रूग्णालयात पाच वर्षानंतर नवीन सिटीस्कॅन मशीन दाखल झाली आहे. या सिटीस्कॅन मशीनची जोडणी, सॉफ्टवेअर इंस्टॉलेशनची कामे झाली असून, प्रयोगित तत्त्वावर रूग्णांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे.शहरासह परिसरातील अनेक रूग्ण येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येतात. या रूग्णालयातील सिटीस्कॅन मशीन २०१४ मध्ये वैजापूरला शिफ्ट करण्यात आली होती. परिणामी, जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अपघातातील जखमींसह इतर रूग्णांना सिटीस्कॅनसाठी खासगी रूग्णालयात न्यावे लागत होते. जिल्हा रूग्णालयाने एका खाजगी रूग्णालयाशी टाय-अप केल्याने तेथील उपचाराचा खर्च जिल्हा रूग्णालयाकडून दिला जात होता. मात्र, इतर अनेक रूग्णांना खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता. सिटीस्कॅन मशीन लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी रूग्णालय प्रशासनाकडून वरिष्ठ स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला जात होता. या पाठपुराव्याला यश आले असून, रूग्णालयात पंधरा दिवसांपूर्वी नवीन सिटीस्कॅन मशीन दाखल झाली आहे. मशीनमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करण्यात आले असून, प्रयोगिक तत्वावर तपासणी केली जात आहे. येणाºया तांत्रिक अडचणी संबंधित कंपनीच्या इंजिनिअरकडून दुरूस्त करून घेतल्या जात आहेत.
‘सिटीस्कॅन’ची प्रतीक्षा थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:16 AM