जामखेडसह भोकरवाडी, माळेवाडी, लेभेंवाडी, ठाकुरवाडी, बक्षेवाडी, नागेशवाडी, नारळवाडी, विठ्ठलवाडी, जोगेश्वरवाडी, पिंपरखेड, चिंचखेड, राहुवाडी, गंगारामतांडा, शिरनेर, मठजळगाव, बोडखा आदी गावांत अतिवृष्टी थैमान घातले आहे.
शेतकऱ्यांनी शेतात हजारो रुपये खर्च करून पेरणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मक्का, बाजरी, तुरी ही पिके पावसाने जमीनदोस्त झाली आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून पिकांवर लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच यंदाही अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला आहे. जामखेड मंडळात ३० ऑगस्ट रोजी ९९ मिमी, ०४ सप्टेंबर ११७, ०७ सप्टेंबर १६५ असा एकूण ३८१ मिमी पाऊस झाल्याने २१ गावांतील ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान आहे. झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. असे असतानाही जामखेड मंडळात पंचनाम्याला सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहे.
जामखेड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, ऊस, तुरी, बाजरी ही पिके वाहून गेली आहे. नुकसान होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. अद्यापही पंचनामे करण्यात आले नाही. प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी
महेश औटी, भवानीसिंग चौहान यांनी केली आहे.