अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
अंबड : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री, गुटखा विक्री, अवैध वाळू वाहतूक यासह जुगार, आदी अवैध धंदे जोमात सुरू आहेत. अवैध धंद्यांमुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून, अनेकांचा संसार उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व महसूल विभागाने अवैध धंदे करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.
मानवाधिकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर
देऊळगावराजा : भारतीय मानवाधिकार संघटनेची बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणकुमार काडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत तालुकाध्यक्षपदी जायभाये, शहराध्यक्षपदी पूजा कायंदे, सिदंखेड राजा तालुकाध्यक्षपदी अक्षय मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी केजकर, संतोष कदम, प्रा. झोटे, इंगळे, किशोर चव्हाण, आदींची उपस्थिती होती.