जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन
जालना : शहरात अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्या आणि मटका चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनावर शहरप्रमुख उमेश खाकीवाले, संघटक अनिल वानखेडे, सचिव सुंदर सगट, आनंद बोराडे, आकाश घाटोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सल्लागारपदी सुहास मुंडे यांची निवड
जालना : दि. वैद्यनाथ अर्बन को ऑप. बँक लिमिटेड शाखा जालन्याच्या सल्लागारपदी सुहास मुंडे यांची निवड करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष आ.संतोष दानवे, चेअरमन अशोक जैन यांनी निवड केली. या निवडीचे राजेंद्र राख, सत्संग मुंडे, संजय काळबांडे, रावसाहेब वाघ, देवेंद्र बारगजे, अशोक खेडकर, संदीप हुशे आदींनी स्वागत केले आहे.
-----------------------