जीएसटी विभागाकडून ई-बिलाची अंमलबजाणी करण्याचे निर्देश या आधीच दिले आहेत. असे असताना अनेक व्यापारी, उद्योजक हे त्याचे पालन करताना दिसत नाहीत. या आधीदेखील याच विभागाने अशा प्रकारची तपासणी मोहीम राबविली होती. त्यात जवळपास ६४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
ही मोहीम पूर्वी शहागड ते औरंगाबाद मार्गावरही राबविली होती. यासाठी आता जवळपास २४ अधिकाऱ्यांचे पथक २४ तास जालना ते औरंगाबाद मार्गवरील टोल नाक्यावर तळ ठोकून आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक हे तपसणीच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते आता शक्य नसल्याने मोठा दंड वसूल होत आहे. ही मोहीम आता वरिष्ठांचे पुढील आदेश येईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले. या जीएसटीच्या ससेमिऱ्याने जालन्यातील व्यापारी, उद्योजक हैराण आहेत.
ई-वे बिलाचा कालावधी वाढविला
जीएसटीकडून कुठून कुठे मालाची ने-आण करण्यासाठीचा सर्व तपशील या ई-बिलात असतो. त्यामुळे हे बिल पूर्वी १२ तासच ग्राह्य धरले जात हाेते; परंतु आता जीएसटी विभगाने ही मुदत वाढवून त्या बिलाची ग्राह्यता २४ तास केली असल्याचे सांगण्यात आले.