लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाईपलाईन फुटल्यामुळे जालना शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेला आहे. यावर तातडीने उपयोजना करण्यासाठी पालिका प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात असून, जनतेने पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले आहे.जालना-वडीगोद्री या रस्त्याच्या कामाला काही दिवसापूर्वीच सुरूवात करण्यात आलेली आहे. अंबड शहरानजीक असलेल्या लालवाडी तांड्याजवळ रस्त्याच्या बाजूचा भाग पोकलॅनमुळे जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या पाईपला धक्का लागला त्यामुळे जलवाहिनीला मोठे भगदाड पडल्यामुळे जालना शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.या पार्श्वभूमीवर माजी आ.गोरंट्याल यांनी शनिवारी दुपारी लालवाडी तांडा येथे भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व दुरूस्ती संदर्भात जायकवाडी-जालना योजनेचे काम करणारे कंत्राटदार यांच्या सहका-यांशी चर्चा करून दुरूस्तीसाठी लागणारे साहित्य हे कोलकत्ता, नागपूर आणि मुंबई या तीन ठिकाणीच मिळते. ते साहित्य प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे सांगून जालना शहरातील पाणीपुरवठा लवकराच लवकर सुरळीत होण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करत आहे अशा सूचना गोरंट्याल यांनी दिल्या. यावेळी जालना-वडीगोद्री रस्त्याचे काम करत असलेल्या एजन्सीचे कंत्राटदार शैलेंद्र मेहरा यांनी जलवाहिनी दुरूस्तीसाठी लागणारा जो काही खर्च असेल तो देण्याची तयारी गोरंट्याल यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी इसाखान पठाण, शहर स्वच्छता विभागाचे अभियंता माधव जमधडे, अभियंता दासवाड, अशोक भगत आदींची उपस्थिती होती.अंदाज चुकला : दुरुस्तीचे साहित्य मागवलेजालना-अंबड मार्गाचे काम सुरू झाले आहे. हे काम सुरू झाल्यानंतर ज्या भागातून जलवाहिनी अंथरली आहे. तीचा अंदाज जेसीबी तसेच पोकलॅन चालविणाºया चालकाला येत नाही. हा अंदाज न आल्यानेच दोन दिवसांपूर्वी अंबड-जालना पाईपलाईन फुटली ही पाईप लाईन करतांना त्यात अत्यंत उच्च दर्जाचे डीआय पाईप वापरले होते.
‘पाणी-बाणी’ संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 1:03 AM