जालना : आधी पावसाची हुलकावणी, मध्ये अवकाळी पावसाचे संकट आणि नंतर आता पुन्हा रबी हंगामात जोमात असलेल्या पिकांवर गारपिटीचा हल्ला यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असून, यामुळे डाळिंब, द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू आणि हरभ-याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून बळीराजाला दिलासा देण्यासाठी जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी बुधवारी सकाळी थेट नुकसान झालेल्या शेतात जाऊन पाहणी करून दिलासा देत शासकीय मदतीचे आश्वासन दिले.परतूर तालूक्यात काढणीस आलेल्या पिकांचे नुकसानपरतूर : तालूक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने काढणीस आलेल्या व काढून घेतलेल्या ज्वारी व गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाले.परतूर तालुक्यात मंगळवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या ज्वारी, गव्हाची काढणी सुरू आहे. या पावसाने काढणीस आलेल्या व शेतात काढून ठेवलेल्या गव्हू व ज्वारीचे काही प्रमाणात नुकसान झाले. या पावसात वादळी वारा मोठ्या गारांचा समावेश नसल्याने पिकांचे फारसे नुकसान झाले नाही.दरम्यान उशिरा पेरलेल्या गहू, ज्वारी, हरभरासह ईतर पिकांना मात्र हा पाउस लाभदायक ठरला. या पावसा दरम्यान काही काळ वीज गुल झाली होती. विजांंचा कडकडाट व मेघगर्जनेसह हा पाउस झाल्याने बराच काळ वीज गायब होती.जालना तालुक्यात नुकसान, गोरंट्याल यांनी केली पाहणीजालना : जालना तालुक्यातील जवळपास १४ ते ३० गावांमध्ये मंगळवारी रात्री हलका ते जोरदार पाऊस पडला. काही गावांमध्ये गारपीटही झाली. या पावसाने हाततोंडाशी आलेला घास हिरवला असून, या सर्व नुकसानीची पाहणी आ. कैलास गोरंट्याल यांनी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी गाढेकर, मंडळ अधिकारी व्ही.एस. लोखंडे, तलाठी कळकुंबे, मोरे यांच्यासोबत केली. आ. गोरंट्याल यांनी कडवंची, वरूड, वडगाव, न्हावा, वडगाव, धारकल्याण आदी गावांना भेटी दिल्या. कडवंची येथे द्राक्ष बागांना भेटी देऊन त्यांनी शेतकºयांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच नुकसानीचे रितसर पंचनामे करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले. या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह फळबांगाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.राणी उंचेगाव परिसरात खोतकरांकडून पाहणीराणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे खरिपाच्या पिकांबरोबर मोसंबी, द्राक्षे, डाळिंब, आंबा या फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे. गाढे सावरगांव येथील द्राक्ष बागाची माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नायब तहसीलदार उन्हाळे, कृषी मंडळ अधिकरी पुरी, डी.के.अंबडकर, संजय लोंढे, ढगे, तलाठी पुष्पा सानप, सखाराम भुतेकर तसेच कृषी आणि महसूल विभागातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. राणी उंचेगाव परिसरातील गाढे सावरगाव, मुढेगाव, तळेगाव, राठी अंतरवाली, मानेपुरी, चापडगाव, पानेवाडी, दाई अंतरवाली, भुतेगाव, निपाणी पिंपळगाव, रवना, मंगू जळगाव या गावांमध्ये रात्री जोरदा पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाने मोसंबीच्या अंब्या बहाराची बोराच्या व लिंबाच्या आकाराची फळे गळून पडली. द्राक्ष बागांमध्ये गारपिटीमुळे द्राक्षांचे घड गळून जमिनीवर पडल्याने द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. आंबा, डाळिंब या फळबागांनाही या गारपिटीचा फटका बसला.संतोष दानवेंकडून पाहणीजाफराबाद : तालुक्यातील आंबेगाव, डहाके वाडी, गाडेगव्हाण, देळेगव्हाण, गणेशपूर, अकोला देव, टेंभुर्णी आणि भातोडी भागात अचानक झालेल्या गारपीट व वादळी वाºयासह मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला.या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आ. संतोष दानवे यांनी बुधवारी केली. त्यांनी विविध शेतकºयांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान जाणून घेतले. तसेच उपविभागीय अधिकाºयांना तातडीने पंचनामे करण्याचे सूचना दिल्या आहेत. या पावसामुळे प्रामुख्याने गहू, ज्वारी, मका,कांदा,हरभरा व शेडनेटमध्ये घेत असलेल्या विविध पिकांचे नुकसान झाले आहे. या पाऊस आणि वादळी वाºयामुळे मौजे आंबेगाव येथील गावातील जि.प.शाळेचे पत्रे उडून गेले. तसेच गावातील श्रीरंग गोफणे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. यावेळी तहसीलदार सोनी, गंगावणे , शेराण पठाण उपस्थित होते.घनसावंगी शहरासह तालुक्यात द्राक्ष, फळबागांचे नुकसानघनसावंगी : तालुक्यातील शेतक-यांच्या मागे सुरू असलेल्या संकटाचा ससेमिरा काही केल्या संपेना. नैसर्गिक आपत्तीची जणू काही सारखी रांगच आहे. मंगळवारी रात्री पुन्हा ८ वाजेनंतर घनसावंगी तालुक्यात जोरदार वादळी वा-यासह पाऊस व गारा कोसळल्या.यामुळे शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेल्या ज्वारी, हरभरा, गहू पिकाचा घास हिसकवला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पिकाबरोबरच द्राक्ष, मोसंबी आंबे या फळबागांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.घनसावंगी शहरासह तालुक्यातील राणी उंचेगाव, आंतरवाली टेंभी, करडगाव, आंतरवली राठी, खडका, खालापुरी, भायगव्हाण या गावात १७ रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:56 PM