लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परभणी व पूर्णा शहराची तहान भागवण्यासाठी परतुरच्या निम्न दुधना प्रकल्पातील पाणी तिसऱ्यांदा सोडण्यात आले आहे. मंगळवारी धरणाच्या चार दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.परभणी व पूर्णा शहर ही दोन शहरे तीन महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करत आहेत. या पूर्वीही या शहरांसाठी दोन वेळा पाणी सोडण्यात आले होते. पाणी सोडण्याची ही तिसरी वेळ आहे. मंगळवारी सायंकाळी निम्न दुधनाचे प्रकल्पाचे १९, २०, ०१ ,०२ क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले. चारदरवाजातून १४९४. १५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग चार ते पाच दिवस सुरू राहणार आहे.
निम्न दुधनातून परभणीला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:02 AM