शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

घनसावंगी तालुक्यात नऊ गावांत टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:01 AM

तालुक्यातील ९ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, चार गावांनी टँकरसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे खरीप पीक पूर्णपणे गेले. नदी-नाले कोरडेठाक पडले. तालुक्यातील जोगलादेवी, मंगरूळ, राजाटाकळी केटीवेअर भरले नाही. म. चिंचोली, मांदळा, येवला, सिद्धेश्वर पिंपळगाव, देवी दहेगाव तेलगू तलाव कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील गावागावातील विहिरींनी तळ गाठला आहे.सद्य परिस्थतीत तालुक्यातील ९ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून, चार गावांनी टँकरसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे. घनसावंगी तालुक्यात ७० हजार पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. गुरांसाठी शेतकरी ऊस विकू लागले आहेत. साखर कारखाने सुरू होण्याअगोदरच पाणी आटल्यामुळे ऊस करपले, वाढे वाढले आहेत तर तालुक्यातील गावामध्ये सव्वादोन लाख हजार लोकसंख्येसाठी पूर्णपणे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. अजून सहा महिने जायचे आहेत पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होत चालला आहे. यामुळे लहान मुले व वृद्धांचे हाल होत आहेत.प्रशासन स्तरावर यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने जलसाठ्यात वाढ झाली होती.९ गावांना लागते दररोज २५ टॅकर पाणी, तीन विहिरींचेही केले अधिग्रहणसध्या तालुक्यात नऊ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. दररोज या ९ गावांना जवळपास २५ टँकर पाणी लागते. त्यामध्ये वडीरामसगाव, बाचेगाव, राहेरा, रांजणी प्रत्येकी १, रांजणी २, शिंदे वडगाव, बहीरगड, राजेगाव, राहेरा तांडा टँकर नऊ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हे टँकर भरण्यासाठी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी ३ विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. तालुक्यातील रामगव्हाण, भायगव्हाण, बोधलापुरी, बोलेगाव या चार गावांनी टँकरची मागणी केलेली आहे. यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्यात आल आल्याची माहिती नायब तहसीलदार संदीप मोरे व गट विकास अधिकारी पांडव यांनी दिली.

टॅग्स :droughtदुष्काळwater transportजलवाहतूक