लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. ५२३ गावे आणि ११९ वाड्यात पिण्याचे पाणी शिल्लक नाही. टँकरविना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ११ लाख नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. ६३५ टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.गती वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थितीही घोषित केली. अपुऱ्या पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे, तर मध्यम प्रकल्पांत पाणी शिल्लक राहिले नाही. बंधारे, नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्ह्यातील १४ हजाराहुन अधिक जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत. जालना तालुक्यात १०२, बदनापूर तालुक्यात ८०, भोकरदनमध्ये ११६, जाफराबाद ७४, परतूरमध्ये २६, मंठा ५८, अबंड १०२, घनसावंगी तालुक्यात ७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील ६९३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २२१ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत. टँकरसाठी ४७२ विहिरींचे अधिग्रहण शासनाने केले आहे. जालना तालुक्यातील १ लाख ८१ हजार ५५६ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. बदनापूर तालुक्यातील दीड लाख, भोकरदन दोन लाख, जाफराबाद १ लाख, परतूर ५२ हजार, मंठा ८३ हजार, अंबड दीड लाख, घनसावंगी तालुक्यातील दीड लाख नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागत आहे.
जालना जिल्ह्यात ६३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:15 AM