जालना- मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या मागणीवरून विविध मतप्रवाह समोर येत असून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर खरमरीत टीका केली आहे. "मनोज जरांगे अजून लहान आहेत. त्यांनी आणखी अभ्यास करावा, असा हल्लाबोल राणेंनी केला आहे, यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांनी अभ्यास करावा; राणेंचा पुन्हा जोरदार प्रहार
" आमचा अभ्यास आहे नाही, यापेक्षा गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे आहे. गोरगरिब मराठ्यांचे कल्याण होत आहे. ३२ लाख नोंदी आतापर्यंत मिळाल्या आहे. २३ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणार आहे, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले. गोरगरिब मराठ्यांचे आता कल्याण होत आहे. हे गरिब मराठ्यांना माहित आहे, आमचा अभ्यास आहे, नाही हा भाग वेगळा आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
नारायण राणेंचा जरांगे पाटलांवर जोरदार प्रहार
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या मागणीवरून विविध मतप्रवाह समोर येत असून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर खरमरीत टीका केली आहे. मनोज जरांगे अजून लहान आहेत. त्यांनी आणखी अभ्यास करावा, असा हल्लाबोल राणेंनी केला आहे. पुणे शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, "आरक्षण कसं मिळतं, भारतीय राज्यघटनेत आरक्षणाबाबत काय तरतुदी आहेत, हे जरांगे पाटलांनी जाणून घ्यावं. ओबीसीतून आरक्षण हवं की नको, हे त्यांनी मराठा समाजाला विचारावं. कोणताही मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार नाही." मनोज जरांगे पाटील यांच्या आणखी एका वक्तव्याबद्दल नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असताना राणे काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं. "कोण आहे जरांगे पाटील? मला माहीत नाही, मी त्यांना ओळखत नाही. कशाला तुम्ही त्याचं सतत नाव घेता? त्यांना विचारून या की घटनेच्या कोणत्या कलमानुसार मराठा आरक्षण दिलं जावं," असं राणेंनी म्हटलं आहे.