शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

आत्मकल्याणासाठी गणेशलालजींचे समताधिष्ठित तत्त्वज्ञान स्वीकारावे- विवेकमुनीजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 01:04 IST

प. पू. गणेशलालजी म. सा. यांनी घालून दिलेले समतेचे सूत्र आपण पाळले पाहिजे, असा हितोपदेश प.पू. विवेकमुनीजी म.सा. यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प. पू. गणेशलालजी म. सा. यांचे समताधिष्ठीत सूत्र प्रत्येकाने अंगीकारले तर दु:खाचे निश्चितच हरण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्याबद्दल सांगावे तितके कमी असले तरीही त्यांनी घालून दिलेले समतेचे सूत्र आपण पाळले पाहिजे, असा हितोपदेश प.पू. विवेकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलताना दिला.प. पू. गणेशलालजी म. सा. ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित गुरु गणेश या विषयावरील विशेष प्रवचनात प.पू. विवेकमुनी बोलत होते. यावेळी प.पू. श्रुतमुनिजी म.सा., मौन साधक प.पू. सौरभमुनीजी म. सा. युवा प्रेरक प.पू. गौरवमुनीजी म.सा., तप रत्नाकर प.पू. अक्षरमुनीजी म.सा., प.पू. प्रणवमुनीजी म.सा., प.पू.श्री दिलीपकंवरजी म.सा., प.पू.नमिताजी म. सा; प.पू. सुशिलकंवरजी म.सा आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना प. पू. विवेकमुनीजींनी समता शब्दाचा अर्थ विस्ताराने सांगितला. ते म्हणाले की, स म्हणजेच सावधान, आपल्या प्रत्येकालाच सावधान होण्याची नितांत गरज आहे. आपण जर सावधानतेचे तत्व अंगिकारले नाही तर काहीही होऊ शकते.परंतू सुखकर आणि चारित्र्य संपन्न जीवनासाठी आपल्याला सावधान होऊन जगण्याची गरज आहे. म म्हणजे गुरु की बात मानो. गुरु जे-जे सांगतील ते-ते आपण ऐकले पाहिजे. कारण गुरु कधीही वाईट सांगत नाहीत. त्यांची प्रत्येक गोष्ट ही आपल्या हिताची असते आणि त्यातच आपले कल्याण दडलेले आहे. म्हणूनच गुरु सांगतील ते ऐकले पाहिजे.त म्हणजे मनुष्याने भक्तीत तल्लीन झाले पाहिजे. आपण भक्ती करतो परंतू त्यात मन लावत नाहीत.म्हणून आपली भक्ती पावन होत नाही, ती लोप पावली जाते. म्हणूनच आपण प्रत्येकाने प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या समताधिष्ठित त्रिसूत्रीचा अंगीकार करुन मार्गक्रमण केले पाहिजे, असे सांगून प. पू. विवेकमुनीजींनी गुरु गणेशलालजी यांच्या अनेक गौरवशाली कार्याचा आपल्या प्रवचनात उल्लेख करुन पुण्यतिथी समारोहातील कार्यक्रमात सहभागी होतांनाच उणिवांवर बोट ठेवण्याऐवजी सहकार्य करण्याचे आवाहनही केले.यावेळी समाजातील श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शुक्रवारी पुण्यतिथी निमित्त विशेष कार्यक्रम होणार आहे.प. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या पुण्यतिथीनिमित्त तपोभूमीत देशभरातून मोठ्या संख्येने भक्तगण आलेले असून त्यांच्या सुरक्षेसाठी जैन श्रावक संघाच्यावतीने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, खासगी सुरक्षा रक्षकांबरोबरच पोलिसांची मोठी कुमक तैनात केली आहे. संघाच्यावतीने सुरक्षेची व्यापक प्रमाणात काळजी घेण्यात आली असतांनाच स्वयंसेवक आणि संघाचे पदाधिकारीही देखरेख करत आहेत.आज मुख्य समारोहप. पू. गणेशलालजी म. सा. यांच्या पुण्यतिथीचा शुक्रवारी मुख्य समारोह होत असून यानिमित्त साधन के स्त्रोत- गुरु गणेश या विषयावरील विशेष प्रवचनासह विविध कार्यक्रम होणार आहेत.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रमcommunityसमाज