शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

२३ डिसेंबर रोजी बीडच्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू- मनोज जरांगे

By विजय मुंडे  | Published: December 17, 2023 3:00 PM

आता उपोषण नको, थेट भूमिका घ्या, मराठा समाजाची भूमिका

जालना: मराठा आरक्षण आणि समाजाला दिलेल्या आश्वासनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधीमंडळात भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे शासनाला आपली पुढील भूमिका समजू नये, यासाठी २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. याचवेळी २४ डिसेंबर नंतर उपोषण नको, भेट भूमिका घ्या, अशी आग्रही मागणी करीत मराठा समाज बांधवांनी मुंबई, मुंबई अशा घोषणा दिल्या. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनीही समाज बांधवांच्या मागणीनुसार भूमिका जाहीर करू, असे आश्वासन दिले.

अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आजवर मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदाेनाची माहिती देत विविध विषयांवर जरांगे पाटील यांनी माहिती दिली. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देवून आरक्षण देण्यासाठी शासनाला दिलेली २४ डिसेंबर हीच डेडलाईन आहे. त्यात आता बदल होणार नाही. आजवर ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार संबंधितांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू करावे, सापडलेल्या नोंदींना कोठेही चॅलेंज होणार नाही.

त्यामुळे त्या नोंदीचा आधार घेवून शासनाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, नोकरभरतीसाठी पात्र असलेल्या १३ हजार मराठा युवकांना नियुक्त्या द्याव्यात, आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती करू नये आणि केलीच तर मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवून करावी, सर्व देवस्थानाकडील नोंदी, राजस्थानातील भाट लोकांकडील नोंदी, देवीच्या लस दिल्यानंतर घेतलेल्या नोंदी, टीसीवरील नोंदी शासकीय अभिलेखे म्हणून त्याची नोंद घ्यावी, आई ओबीसी- वडील मराठा असतील तर पोराला दोघांच्या जाती लावाव्यात यासह इतर मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या. मराठा आरक्षणाची लढाई विचाराने, ताकदीने आणि युक्तीने लढायची आहे. कोणीही उद्रेक करू नका, शांततेत मोठी ताकद आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिकाही मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी राज्यातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्षमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सकाळी मोबाईलवर संवाद साधून शासन दिलेल्या आश्वासनांवर ठाम असल्याचे सांगितल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाची भूमिका सोमवारी मांडणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या पुढील आंदोलनाची दिशा आज जाहीर करायची नाही. गनीमिकाव्याने लढायचे, असे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधीमंडळात सोमवारी कोणती भूमिका मांडणार याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड