लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : येथील आठवडी बाजाराच्या जागेची देखभाली अभावी दुरवस्था झाली आहे.जागोजागी ओट्याची पडझड झाल्याने दुकानदारांची गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधांचा अभाव आहे.परतूर शहरात गाव व मोंढा दोन ठिकाणी दर शनीवारी आठवडी बाजार भरतो, या बाजारात येणाऱ्या भाजी पाला विक्रेत्यांडून व ईतर व्यवसायीकाकडून नियम बाहय अधीकची वसूली केली जाते. मात्र या ठिकाणी काहीच सुविधा देण्यात येत नाहीत. गाव भागातील बाजारातील ओटयांची पडझड झाली आहे. बाजाराचा काही भाग काटेरी झूडपांनी वेढला आहे. पावसाळयात चिखल, इतर वेळी धुळीचे लोट या बाजारात उठतात.बाजाराच्या अजूबाजूला टाकलेला कचरा वा-याने बाजारात घुटमळत राहतो. या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने बाजारात येणा-या व्यापा-यांना घरूनच पाणी आणावे लागते.ग्रामिण व शहरी भागातून बाजारासाठी येणा-यांनाही पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी सोय नाही. तरी या बाजाराच्या दुरावस्थे कडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देवून सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत आहे.
आठवडी बाजाराच्या जागेची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:33 AM