काँग्रेस सेवा दलाच्या पायी पदयात्रेचे शहरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:48 AM2020-02-03T00:48:12+5:302020-02-03T00:49:05+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने औरंगाबाद ते मॉ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजापर्यंत निघालेली पायी पदयात्रा शनिवारी जालना शहरात मुक्कामी आली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने औरंगाबाद ते मॉ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजापर्यंत निघालेली पायी पदयात्रा शनिवारी जालना शहरात मुक्कामी आली. ही पदयात्रा रविवारी सकाळी सिंदखेड राजाकडे मार्गस्थ होत असताना शहरात ठिकठिकाणी या पदयात्रेचे काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात
आले.
ही पदयात्रा शनिवारी रात्री शहरातील पाठक मंगल कार्यालय येथे पोहोचली. जिल्ह्यातील सामाजिक व शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा, तसेच विशेष गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. जालना तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास केशवराव औताडे यांच्यातर्फे देण्यात आली. याप्रसंगी आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते सदरील आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे बदर चाऊस, अनुसूचित जाती विभागाचे दिनकर घेवंदे, प्रदेश सेवादलाचे उपाध्यक्ष अनिल मानकापे, कृष्णा पडूळ, किशन जेठे, शेख शमशू, जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष विजय जºहाड, महिला सेवा दलाच्या जिल्हाध्यक्षा चंदा भांगडिया, मंगल खांडेभराड, बद्रीनाथ जाधव, मिर्झा अन्वर, सय्यद जावेद अली आदी मान्यवरांची उपस्थिती होती. रविवारी सकाळी मुक्तेश्वर द्वार येथून ही
यात्रा सिंदखेडराजा रवाना
झाली.
सामाजिक जाणीव : शेतकरी कुटुंबाला मदत
काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पायी दिंडी संकल्पनेबाबत उपस्थितांनी मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे, समाजासमोर उभारलेल्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
यानिमित्त जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शेतकरी कुटुंबाला मदत करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.