लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्यातीलप्रवाशांसाठी नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या नांदेड ते दिल्ली मराठवाडा क्रांती एक्स्प्रेसचे मंगळवारी येथील रेल्वेस्थानकात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.उन्हाळ्याच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशी आणि पर्यटकासाठी विविध रेल्वे गाड्या सुरु करण्यात येतात मात्र, गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारची रेल्वेसेवा नांदेड येथून सुरु व्हावी अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाव्दारे करण्यात येत होती. मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत होते.दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पदी नव्यानेच रुजू झालेले गजानन माल्ल्या यांना संषर्ष समितीच्या पदधिकाऱ्यांनी हैदराबाद येथे जाऊन माल्ल्या यांची भेट घेऊन राजधानीच्या ठिकाणी जाण्यासाठी मराठवाड्यातील प्रवासी आणि पर्यटकांना जाण्यासाठी रेल्वे नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सांगितले.तसेच नांदेड येथून नवीन रेल्वे नांदेड ते दिल्ली मराठवाडा क्रांती रेल्वे सुरु करण्याची मागणी केली होती. याची रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्ल्या यांनी दखल घेत रेल्वे सुरु करण्याचे आश्वासन रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले होते. प्रशासनाच्यावतीने नांदेड-दिल्ली मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेशलाल चौधरी, उपाध्यक्ष सुभाषचंद्र देविदान, सचिव फेरोजअली, अशोक मिश्रा, बाबुराव सतकर, रमेश अग्रवाल आदींची उपस्थित होती.असा आहे गाडीचा मार्गजालना स्थानकात ही गाडी दर मंगळवारी सकाळी ११ वाजता पोहोचणार असून दिल्लीवरून नांदेडकडे जातांना रात्री ८.२० वाजता गाडी जालन्यात पोहोचेल. ही गाडी नांदेड ते दिल्ली दरम्यान मुख्य स्थानकावर थांबणार आहे. यामध्ये जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगाव, भुसावळ या मार्गावरी गाडीला थांबा राहणार आहे.
जालन्यात मराठवाडा क्रांती एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 1:17 AM