लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ केल्याबद्दल न्यायालयाने आरोपी असलेल्या पतीस दीड वर्षा$ची सक्त मजूरीची शिक्षा व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी संतोष आसाराम राठोड (घोन्शी तांडा ता. घनसावंगी) असे आरोपीचे नाव आहे.घोन्शी तांडा येथे २९ सप्टेंबर २०१२ रोजी रविना संतोष राठोड हिने अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेतले. त्यात तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबाबात तिने मला माझा नवरा, माझ्यावर नेहमी संशय घेऊन मारहाण करतो असे सांगितले होते. म्हणून रविनाने अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेतले होते. यानंतर रविनाचे वडील अशोक भगवान आढे यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात पती संतोष व त्याच्या नातेवाईकाविरुध्द हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार व इतर कारणानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊन सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. एस. घुमरे यांनी संतोष राठोड याने छळ केल्याबद्दल ही शिक्षा सुनावली. यात अभियोक्ता अॅड. दिपक कोल्हे यांनी काम पाहिले.
पत्नीचा छळ; आरोपीस दीड वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:42 AM
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ केल्याबद्दल न्यायालयाने आरोपी असलेल्या पतीस दीड वर्षा$ची सक्त मजूरीची शिक्षा व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
ठळक मुद्देजालना : न्यायधीश घुमरे यांनी सुनावली शिक्षा