जालना : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून पिकांना ५० हजार रुपये व फळपिकांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली.
जालना तालुक्यातील गोलापांगरी, गणेशनगर, बठाण शिवारातील नुकसानीची दानवे यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटले असून, हजारो एकर शेतातील पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, तूर, कापूस, मूग, सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासह इतर योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामेश्वर भांदरगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, गोवर्धन कोल्हे, तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष रवी कायंदे, अंतरवाला सरपंच बळीराम शिंदे, बठाणचे सरपंच ज्ञानेश्वर देवडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष कृष्णा गायके, डॉ. ज्ञानेश्वर मोरे आदींची उपस्थिती होती.
फोटो