शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

दारूबंदीसाठी महिलांनी जागून काढली रात्र, आंदोलनाला चोवीस तास; आता आरपारची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 2:08 PM

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी चोवीस तास उलटूनही सुरूच आहे

पारध (जालना) :  भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी चोवीस तास उलटूनही सुरूच आहे. जोपर्यंत दारू विक्रीचे दुकान कायमचे बंद होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा या रणरागिनींना घेतल्याने पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांना  महिलांना दारू दुकान बंद करण्याची कायदेशीर प्रक्रिया सांगण्याची वेळ आली आहे.

पिंपळगाव रेणुकाई येथे दोन देशी तर दोन विदेशी दारुची दुकाने असून येथे मुबलक प्रमाणात दारू मिळत असल्याने अनेकजण  दिवसभर दारूच्या व्यसनात बुडालेले असतात. गावातील अनेक तरुण देखील व्यसनाच्या विळख्यात ओढल्या जात आहेत. त्यामुळे गावात सतत भांडण तंटे होत आहेत. पती-पत्नी यांच्यात दारूमुळे वाद होण्याचे प्रकार वाढले असून, अनेकांचे संसार मोडले आहेत. तर काही मोडण्याच्या मार्गावर आहेत.  गावात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. या उलट हे प्रकार आणखीच वाढत गेले. अखेर गुरुवारी सकाळी शेकडो महिलांनी एकत्र येत एकत्र जमल्या. गावातील दोन्ही दारू दुकानांसमोर ठिय्या मांडून या दुकानांची शटर बंद करून घेत दारू विक्री बंद पडली. त्यामुळे दारू विक्रेत्यांनी पोलिसांना पाचारण केले. परंतु महिलांनी पोलिसांना न जुमानले नाही.  दारू दुकानात कंटनेरमध्ये विक्रीसाठी आलेली दारूचे खोके स्वत: कंटनेरमध्ये चढून फेकून दिले. सायंकाळी शेतातून कामाहून आलेल्या काही महिलांनी या आंदोलनात सहभागी झाल्या. त्यामुळे महिलांची ताकद आणखी वाढली . रात्री देखील महिलांचा मुक्काम दारू दुकानासमोर होता. विशेष म्हणजे रात्रीच्या जेवणाचे डबे देखील या महिलांनी अंदोलन स्थळीच मागवले. शुक्रवारी दहा वाजता चोवीस तास उलटूनही महिला दुकांनासमोर ठाण मांडून आहेत.  उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रवीण ठाकूर यांनी आंदोलकर्त्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही निष्फळ ठरला. या संदर्भात पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत म्हणाले, की  आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिल्यास आम्ही दारूबंदीबाबत योग्य कार्यवाही करू.

आम्ही दिवसभर शेतात राबराब राबतो. मात्र घरीची माणसे गावात दारू पितात.  त्यामुळे संसार गाडा चालवायचा कसा. दारुची दुकाने बंद झाले की हे प्रश्न सुटू शकेल. म्हणून आम्ही आंदोलनाचा मार्ग निवडला.- निर्मला चव्हाण, पिंपळगावरेणुकाई

 घरची माणसे दारू पीत असल्यामुळे त्यांचे घराकडे अजिबात लक्ष नाही. सर्व कुटुंब कायम तणावग्रस्त असते. म्हणून दारूबंदी होणे महत्वाचे आहे. जो पर्यंत येथील दारू कायम बंद होत नाही तो पर्यंत आम्ही अंदोलन माघे घेणार नाही.- निर्मला चव्हाण,  पिंपळगावरेणुकाई

या महिलांचे अंदोलन करणे हे रास्त आहे. कारण संसार हा पती पत्नी दोघांचा आहे. पती जर दारू पिऊन कामधंदा करत नसेल तर या माऊल्यांनी काय करावे प्रशासनाने त्यांची हाक ऐकून त्यांना प्रतिसाद द्यावा. - ह.भ.प.ज्ञानेश्वर शेलूदकर-व्यसनमुक्ती पुरस्कर्ते