जालना : शहरातील गांधीचमन येथील महिला रूग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली होती. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीचे फुटेज बारकाईने तपासले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्रभर शोध घेतला. त्यानंतर आज पहाटे परभणी जिह्यातील सेलू येथून एका महिलेला बाळासह पोलिसांनी ताब्यात घेतले.बाळ सुखरूप असून, त्याच्यावर महिला रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अफरिण जाफर शेख( 22 रा. परभणी) असे महिलेचे नाव आहे. बाळ होतं नसल्याने बाळा चोरल्याची कबुली महिलेने दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना तालुक्यातील पारेगाव येथील रहिवासी शेख रूक्साना अहमेद या महिलेची प्रसुती रविवारी रात्री झाली. तिला मुलगा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुल आणि बाळांतीन सुखरूप होते. संबंधित मुलाचे अपहरण करणारी संशयित महिला ही देखील रात्रीपसून रूग्णालयात असल्याचे शेजारील महिलांनी सांगितले. या मुलाला उन्हात घेऊन जावे असे रूग्णालयातील स्टाफने सांगितले. त्यामुळे त्या महिलेने मुलाला घेऊन रूग्णालयाबाहेर गेली. ती परत आलीच नाही.
बाळांतीन महिला ही, थोडी मतिमंद असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याच संधीचा लााभ घेऊन संबंधित बुरखाधारी महिलेने मुलाचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले होते. नवजात मुलाचे अहपरण झाल्याचे कळताच एलसीबीचे निरीक्षक सुभाष भुजंग, कदीम ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी महिलेला सेलू येथून बाळासह ताब्यात घेतले आहे.