लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील जानेफळ येथील अवैध दारु, गुटखा विक्री बंद करण्याची मागणी संतप्त महिलांनी गुरुवारी तहसीलदारांना निवेदनाव्दारे केली.ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव घेऊन गावातील दारुविक्री बंद करण्याची मागणी पोलीस, तहसील प्रशासनाकडे केली होती. मात्र, दोन महिने झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाने अवैध दारुविक्री करणाऱ्या विरोधात काहीच कारवाई केली नाही. परिणामी, गावात सर्रासपणे दारुविक्री सुरु आहे. झाली आहे. यामुळे गावात सर्रासपणे दारुविक्री सुरु आहे. दारूपायी तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. गावात तंटे वाढले आहेत. याचा महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करून विक्री करण्या-या विरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे. जानेफळ पंडित हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रभावी आहे. दरवर्षी ग्रामवासी मोठ्या उत्साहात पुण्यतिथी महोत्सव साजरा करतात. ग्रामगीतेचा प्रसार करण्यासाठी संत महंत यांचे व्याख्यान, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तर दुसरीकडे गावात असे अवैध देशी दारूची विक्री करून तरुण पिढी व्यसनाधीन करण्याचे काम सुरु असल्याने गावाचे स्वास्थ्य बिघडले आहे.ग्रामसभेच्या ठरावाला अवैध व्यवसाय करणारे जुमानत नाहीत. त्याची पोलिसांच्या पाठबळावर अवैध दारू व घटका विक्री सुरू आहे. येणा-या काळात गावात देशी दारू सोबत गुटखा विक्री बंद करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनावर सरपंच रेखा मुरकुटे यांच्यासह २५ महिलांच्या स्वाक्ष-या आहेत.
दारूबंदीसाठी रणरागिणींनी पदर खोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:34 AM