लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निवडणुकीत महिला निवडून आल्या तरी त्यांचे पतीच कारभार करतात व त्यांना काम करु देत नाहीत. महिला कर्तबगार नसल्याने त्यांचे पती कारभारात हस्तक्षेप करतात. अशा कारभारावर प्रसार- प्रचार माध्यमांनी टिकेची झोड उठविली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा महिला आघाडीच्या जालना संपर्कप्रमुख डॉ. मनिषा कायंदे यांनी येथे केले.शिवसेनेच्या वतीने मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी आ. संतोष सांबरे, किसानसेनेचे भानुदास घुगे, सभापती पांडुरंग डोंगरे, जि.प. सभापती सुमन घुगे, महिला आघाडीप्रमुख सविता किवंडे, शिक्षक सेनेचे प्रा. लक्ष्मण गोल्डे, दलित आघाडीचे अॅड. भास्कर मगरे उपस्थित होते.डॉ. कायंदे म्हणाल्या की, खरे तर महिलांना कारभार करता आला पाहिजे. त्यांना पूर्ण संधी उपलब्ध करु न दिली पाहिजे. याकरिता शिवसेनेच्या वतीने महिला आघाडी सक्षम करु न त्यांना तशा प्रकारची शिकवण करु न देण्यात येणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिला आघाडीची शाखा स्थापन होऊन प्रत्येक घरात शिवसेना महिला कार्यकर्त्या तयार व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सविता किवंडे यांनी प्रास्ताविकात कामकाजाचा आढावा सादर केला. तसेच मातोश्री बचत गटांच्या माध्यमातून दीड हजार गटांची नोंदणी झाली असून, आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन जास्तीत-जास्त महिलांना सहभागी करु न घेतले जाईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी लक्ष्मण वडले, अनिरुद्ध खोतकर यांचीही भाषणे झाली.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हरिहर शिंदे यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या दुर्गा देशमुख, राधा वाढेकर, विजया चौधरी, गंगुताई वानखेडे, मंजुषा घायाळ, संगीता नागरगोजे, चंदा शिंदे, सरपंच कालिंदा ढगे, गया पवार, बेबीताई पावसे, सारिका काटकर, मंगल मिटकर, शांता गुंजकर, रंजना सोनवणे, लिलावती मोरे, आशा कोळी, सुनिता कोलते, विजया शंकपाळ, वर्षा काळसकर, माधुरी पडूळ, रोहिणी तोगी, वैशाली जांगडे, अंजली मांडवकर, रंजना कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
लोकप्रतिनिधी महिला तरी कारभार पतींकडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:35 AM
निवडणुकीत महिला निवडून आल्या तरी त्यांचे पतीच कारभार करतात व त्यांना काम करु देत नाहीत. महिला कर्तबगार नसल्याने त्यांचे पती कारभारात हस्तक्षेप करतात. अशा कारभारावर प्रसार- प्रचार माध्यमांनी टिकेची झोड उठविली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा महिला आघाडीच्या जालना संपर्कप्रमुख डॉ. मनिषा कायंदे यांनी येथे केले.
ठळक मुद्देमनिषा कायंदे : जालन्यातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित मेळाव्यात समाज व्यवस्थेवर कडाडून टीका