लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य महिला आयोग महिलांसाठी वेगवेगळ््या माध्यमातून महिला सक्षमीकरण करत असून, महिलांनी आजच्या आधुनिक काळात साक्षर व्हावे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाचे प्रशिक्षक प्रणव पवार यांनी केले.महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई व क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (दरेगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने दरेगाव येथे ग्रामीण भागातील महिलांसाठी डिजिटल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रशिक्षक प्रणव पवार, उषा शिंदे, अंजली गजेली, संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ यांनी महिलांना सांगितले की, डिजिटल साक्षरता ही काळाजी गरज असल्याचे त्यांनी सांगितले. फेसबुक, व्हॉटसअप, नेट बँकिंग, इंटरनेट या विषयीबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन उषा शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप गोंडसे यांनी केले.यावेळी ज्योती चव्हाण, सुरेखा राठोड, निकिता मोहिते, कल्याण पिवळ, अंजली गजेली यांनी विशेष सहकार्य केले. महिलांना मोबाईलमधील अॅप डाउनलोड, इन्स्टॉल कसे करतात, या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अध्यक्षीय समारोपात एम. डी. सरोदे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले. पंचायतराज व्यवस्थेमध्ये महिलांना ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण असून, ग्रामीण असो की, शहरी महिला ही सक्षम व्हायलाच पाहिजे, यासाठी ७३ वी घटना दुरूस्ती करण्यात आली.महाराजस्व अभियान याव्दारे राज्यशासन प्रत्येक गावात जाऊन महिलांना त्यांचे अधिकार पटवून देत आहे, असेही ते म्हणाले.
महिलांनी डिजिटल साक्षर व्हावे-प्रणव पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 1:07 AM