लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महिलांनी स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच बाळाच्या आहाराची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. वैशाली पंडित यांनी केले.जेईएस महाविद्यालय व आर. वेझंजी विज्ञान महाविद्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचे आरोग्य व कुपोषणाची कारणे आणि उपापयोजना या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.महिलाचे आरोग्य व कुषोषणाची कारणे आणि उपाययोजना हा विषय आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. कमी वयात लग्न होणे, जास्तीचे शारीरिक श्रम करणे, निर्णय घेण्याची क्षमता असणे मात्र घेऊ न देणे, यामुळे स्त्रिया अनेक आजारांनी ग्रस्थ होतात. अनेक महिला गरीबीमुळे झोपडपट्टीत राहतात. त्यामुळे त्यांना अस्वच्छता, कचरा, मोकाट जनावरे यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. डेंग्यू मलेरिया यासारख्या रोगांमुळे शरीरातील रक्तदाब कमी होतो. महिलांनी स्वत:च्या वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच आपल्या बाळाची स्वच्छता, आजार, आरोग्य आहार आदींची काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ. वैशाली पंडित यांनी सांगितले.यावेळी डॉ. एस. बी. बजाज, आजीवन विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत एस. महाजन, प्रा. श्रध्दा राठी, संध्याराणी कोंकरे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
‘महिलांनी मुलांच्या आहाराची काळजी घ्यावी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:35 PM