लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील जुना जालना परिसरातील अनेक भागांत पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी परिसरात रास्ता रोको आंदोलन करुन पाणी सोडण्याची मागणी केली.जुना जालना परिसरातील गवळी मोहल्ला, वाणीगल्ली, कपूरगल्ली, आनंदस्वामी गल्ली, मोरांडी मोहल्ला, परिसरात गत पंधरा ते वीस दिवसापासून नळला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी शनि मंदिर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वर्दळीच्या या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला.नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जायकवाडी धरणातून शहराला नियमित पाणीपुरवठा होत आहे. असे असतांना नगरपालिका प्रशासनाकडून पाण्याचे व्यवस्थितपणे साठवणूक केल्या जात नाही. यामुळे शहरातील पाणी सोडण्याची कुठलीच वेळ ठरलेली नाही. रात्री - बेरात्री केव्हाही पाणी सोडण्यात येत यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पिण्यायोग्य पाण्याची नासाडी होते. यामुळे अनेक भागातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याची ओरड होत आहे. कायम असल्याचे महिलांनी सांगितले.जालना शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालिका प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. लवकरच तीन जलकुंभांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जालन्याचा पाणी प्रश्न मिटणार असल्याचे अभियंता बगळे यांनी सांगितले.
पाण्यासाठी महिलांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:00 AM