वाघोडा येथील शेतकरी सीताराम शिंदे यांचे गट नं. ५१ मधील शेतात घर आहे. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सर्वच सदस्य घराबाहेर बसले होते. तेवढ्यात अचानक घराला आग लागल्याचे समजले. शिंदे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत खाण्याचे धान्य व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत बकरू जळाले आहे. गुरुवारी तलाठी भोंगणे यांनी पंचनामा केला. यात ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते. हा पंचनामा तहसीलदार सुमन मोरे यांच्याकडे सादर करण्यात आला. या घटनेमुळे शिंदे कुटुंब उघड्यावर आले असून, शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी वाघोड्याचे सरपंच सतीश लोमटे, संजीव लोमटे, पोलीसपाटील सुंदर ससाणे, रानू घुगे, ज्ञानदेव लोमटे, बबन काळे, गजानन लोमटे, मांगीलाल शिंदे, विकास हांबरे, योगेश लोमटे यांनी केली आहे.
===Photopath===
050321\05jan_2_05032021_15.jpg
===Caption===
शिंदे