लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालयांसह संस्था, संघटनांच्या वतीने शुक्रवारी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन योगासने केली. काही ठिकाणी जनजागृती रॅली काढण्यात आली.आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूलजालना : शहरातील आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी योगाचे धडे घेतले. यावेळी शाळेच्या संचालिका खमर सुलताना, मुख्याध्यापक मोहंमद झिशान, बुशरा, ृविनोद चौबे, योग शिक्षक एलिया श्रीसुंदर आदींची उपस्थिती होती.श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल, अंबडअंबड : शहरातील श्रीमती चंद्रप्रभा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूल येथे क्रीडा शिक्षक हरेश जरांगे यांनी विद्यार्थ्यांनी योगाची माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी योगासने केली. यावेळी शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार कासलीवाल, मुख्याध्यापक व्ही. जी. कांबळे, एन. डी. भारद्वाज आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.जि.प. प्राथमिक शाळा, एरंडगावरामनगर : जालना तालुक्यातील एरंडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रीडा शिक्षक राजेंद्र शेळके यांनी उपस्थितांना योगाची माहिती दिली. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती.मोरया इंटरनॅशनल स्कूल, दानापूरभोकरदन : तालुक्यातील दानापूर येथील मोरया इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल योग गुरू गणेश तांगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून योगाची प्रात्यक्षिके केली. शाळेचे अध्यक्ष रतन जाधव, प्राचार्य बी. के. जाधव, भाऊसाहेब गावंडे, साधना दळवी, जयश्री दांडगे, जाई बावस्कर, जफर, भुतेकर, मंगल दळवी, राजू सिरसाठ, शेख आदींची उपस्थिती होती.छत्रपती शिवाजी हायस्कूलअंकुशनगर : येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक पंढरीनाथ अटकळ, उपमुख्याध्यापक किशोर डावकर, राजकुमार काकडे, सतीश गायकवाड, चक्रधर नाटकर, शहादेव जगताप, दिलीप नाटकर, मच्छिंद्र बांगर, भाऊसाहेब सरोदे, सातपुते, खरात, काळे आदींची उपस्थिती होती.जिल्हा परिषद हायस्कूल, माहोरामाहोरा : येथील जिल्हा परिषद महाविद्यालयात मुख्याध्यापक सुधीर लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगासने केली. दरम्यान योगाबाबत दिलीप सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी श्रीकृष्ण चेके, दिलीप सपकाळ, गणेश पवार, संदीप देठे, जे.एम. सोनवणे, शेवाळे, फुसे, लहाने, वामन सोनवणे, आर.एच. जाधव, ए.डी. पवार, मळेकर उपस्थित होते.जि.प. शाळा, अहंकार देऊळगावजालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत योग शिक्षिका सुनंदा सोमधाने यांनी विद्यार्थ्यांना योगासने करून करून दाखविली. यानंतर विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके केली. दरम्यान उषा मोकींदा, चंद्रकांत खरात, मोकींदा खरात, कृष्णा सोमधाने, आण्णासाहेब सोमधाने आदींची उपस्थिती होती.लोकमान्य प्राथमिक शाळाजालना : शहरातील घायाळनगर येथील लोकमान्य प्राथमिक शाळेत सर्वप्रथम शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी योगासने केली. यावेळी दीपाली सराफ, प्रियंका संघवी, मुख्याध्यापक विजय उबरहंडे आदींची उपस्थिती होती.परिवर्तन प्राथमिक विद्यालयजालना : शहरातील परिवर्तन प्राथमिक विद्यालय व त्रिभुवनदास मा. विद्यालयात यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिगंबर गायकवाड यांनी योगाचे महत्त्व सांगितले. क्रीडा शिक्षक डी. आर. पवार विद्यार्थ्यांना योगासने करून दाखविली. या प्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाजालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा. व्य. स. अध्यक्षा उमा खरात होत्या. तर चंद्रकांत खरात, मोकींदा खरात, कृष्णा सोमधाने यांची प्रमुख उपस्थिती होती. योग शिक्षिका सुनंदा सोमधाने, अण्णासाहेब सोमधाने यांनी विद्यार्थ्यांना योग, प्रार्थना, प्राणायाम, सूयर्ननमस्कार करून दाखविली. दरम्यान मुख्याध्यापक एस. झेड. गजभिये, एस. ए. खरात, व्ही. बी. सोनुने, पी. पी. मानसुरे, एस. यू. उबाळे आदींची उपस्थिती होती.सिपोरा बाजार येथे योग दिनसिपोरा बाजार : येथील जि. प. कें. शाळा आणि राम रहीम विद्यालयात विलास दळवी आणि राजू तोटे यांनी उपस्थितांना योगाविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखविली.बी. पी. उगले इंग्लिश स्कूल, जालनाजालना : जुना जालना परिसरातील बी. पी. उगले इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात योग शिक्षिका मीरा थोरात व पूजा बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक केशव फिस्के यांनी योग का करावे, याविषयी माहिती दिली. दरम्यान बी. आर. डोके, एस. एन. चिरखे, प्रांजली राजेगावकर, शीतल धोंड, अश्विनी सुळे आदींची उपस्थिती होती. सीमा रूद्रे यांनी सूत्रसंचालन केले.जि. प. शाळा, बोररांजणीजालना : घनसावंगी तालुक्यातील बोररांजणी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिके केली. यावेळी शिक्षक व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.शारीरिक संतुलन, मानसिक स्थैर्यासाठी योगाची गरज : भिकूलाल सलेजालना : बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचे विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी क्रीडा विभागाचे संचालक प्रा. डॉ. भिकूलाल सले यांनी मार्गदर्शन केले.योगाचे आपल्या जीवनातील महत्व त्यांनी यावेळी विशद केले. शारीरिक तंदुरूस्ती व मानसिक स्थिरतेसाठी योगा आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी सहभाग घेतला.यावेळी प्राचार्या डॉ. कविता प्राशर, डॉ. प्रवीण कोकणे, डॉ. सुरेश कागणे, प्रा. प्रियदर्शनी भवरे, डॉ. कल्याण कुंभार, डॉ. निशिकांत लोखंडे, प्रा. डॉ. सुधीर देशपांडे, डॉ. कुणाल देशपांडे, डॉ. निधी तिवारी, डॉ. क्षमा अनभुले, डॉ. स्वाती पुरी, प्रा. योगिता डेंगळे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
जागतिक योग दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:28 AM