शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अवघ्या चार महिन्यात टरबूज बीज उत्पादनातून मिळवले लाखोंचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 3:59 PM

मंठा तालुक्यातील तळणी येथे पाच शेतक-यांनी टरबुज बीज उत्पादनातून अवघ्या चार महिन्यांत लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.परिसरातील शेतकऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

जालना : मंठा तालुक्यातील तळणी येथे पाच शेतक-यांनी टरबुज बीज उत्पादनातून अवघ्या चार महिन्यांत लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.परिसरातील शेतकऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

शेतकरी  येथील शिवाजी गुजर, अशोक खरात, शिवाजी सरकटे, अरुण सरकटे व विकास सरकटे यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये एका खाजगी कंपनीकडून रोपे, मर्चिग, ग्रीननेट मिळवत अर्ध्या एकरात टरबुजाची लागवड केली. टरबुज लावगडीपासून ते बीजउत्पादन होईपर्यंत कंपनीकडून शेतकऱ्यांना  मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना लावगडीपासून ते   बीजउत्पादनापर्यंत ३० ते ४० हजारांचा खर्च  आला. योग्य संगोपन केल्याने  . शेतकऱ्यांना चार महिन्यांत दिड ते दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळाल्याचे  शेतकरी शिवाजी गुजर यांनी सांगितले. मार्चमध्ये अवकाळी पाऊस झाला. जवळपास ५०० ते १ हजार टरबुज फुटल्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी विकास सरकटे  यांनी सांगितले. मात्र अद्यापही शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याने फळउत्पादक  शेतकऱ्यात संताप आहे.

ग्रामीण शेतकरी वळला शेडनेटकडे ... तळणीसह कोकंरबा , उस्वद व वडगाव सरहद येथील शेतकऱ्यांनी नैर्सगिक आपत्तीला न डगमगता  शेडनेटव्दारे शेती करण्यास प्राधान्य देत आहेत. यामध्ये टोमॅटो मिर्ची, टरबुज, काकडी आदींचे बीजउत्पादन घेण्याकडे शेतक-यांचा कल दिसून येत आहे. तळणीसह परिसरातील गावात ५०  ते ५५ शेडनेटमधून बीजउत्पादन शेतकरी लाखोंचे उत्पन्न मिळवित असल्याचे उस्वदचे राम चट्टे व कोकंरबा येथील डिगाबर इक्कर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसाmarket yardमार्केट यार्ड