लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी जालना येथील उद्योजक योगेश मानधनी यांची फेरनिवड झाली असून, जालन्यातील कालिका स्टीलचे संचालक अनिल गोयल यांची अतिरिक्त सचिव तर पदावर तर सिध्दिविनायक स्टीलचे संचालक दिनेश अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.या असोसिएशनची बैठक नुकतीच मुंबईत ११ जानेवारीला पार पडली. त्यात सर्वानुमते योगेश मानधनी यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. या कार्यकारिणीत सचिव कमलकिशोर गुप्ता, उपाध्यक्ष विपीन अग्रवाल, कोषाध्यक्ष महेशचंद्र गर्ग, सहसचिव आशिष गुप्ता, संचालक मनोहरलाल सिंघानिया, मोहमंद शफीक खान, श्रावण अग्रवाल, सुरेंद्र लोढा, विष्णूकुमार ओझा यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. जालन्यातील उद्योजकाला अध्यक्षपदाचा पुन्हा एकदा सन्मान मिळाल्याने मोठे स्वागत होत असून, यापूर्वी योगेश मानधनी यांनी मुंबईत देशातील पाच राज्यातील स्टील उद्योजकांची परिषद घेऊन त्यात केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्रसिंग यांना निमंत्रण दिले होते. त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील स्टील उद्योगांमध्ये संशोधन आणि विस्तारासाठी ३०० कोटी रूपये दिले जाहीर केले होते. हे योगेश मानधनी यांच्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाले होते. मानधनी, गोयल आणि अग्रवाल या जालन्याच्या स्टील उद्योजकांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
स्टील असोसिएशनच्या राज्याध्यक्षपदी योगेश मानधनी यांची फेरनिवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:22 AM