शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कर्जमाफीचे १२५० कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:48 AM

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला १ हजार २५० कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यात प्रारंभी पंतप्रधान किसान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचा तिसरा हप्ता मिळाला नाही, अशा जवळपास १ लाख ३० हजार शेतक-यांचे खातेक्रमांक, आयएफसी कोड जुळत नसल्याने अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. यासाठी तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांनी ज्या शेतक-यांच्या या अडचणी आहेत, त्या सोडविण्यासाठी त्या त्या गावात जाऊन १५ दिवसांत हा प्रश्न निकाली काढावा असे निर्देश टोपे यांनी दिले.यासह वादळी वारे आणि गारपीट तसेच अवकाळी पाऊस यामुळे देखील शेतक-यांचे गेल्या वर्षी मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्याला ४८० कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यातील केवळ ५१ कोटी रुपये येणे अद्याप शिल्लक आहे. त्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत १ लाख ९० हजार शेतक-यांपैकी केवळ २ हजार शेतक-यांचे आधारलिंक अपडेट करणे शिल्लक आहे. तेदेखील आठवड्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा सहकार उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, बाळासाहेब वाकुळणीकर यांच्यासह तहसीलदार, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.बैठक : अधिका-यांनी आळस झटकावाशासन पातळीवरुन सर्व ती मदत शेतक-यांसाठी केली जात आहे. असे असले तरी प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी पाहिजे त्या तत्परतेने काम करत नसल्याचे दिसून आले. अधिका-यांनी आळस झटकून काम करावे नसता कामे न करणाºयांची स्वतंत्र यादी बनवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीfundsनिधी