ओबीसी समाजासमोरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:30 AM2019-10-19T00:30:16+5:302019-10-19T00:31:55+5:30
माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले.
जालना : तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी जालना येथे परिषदेचा पहिला मेळावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण मिळवून दिले होते. या घटनेचा मी आणि डॉ. पंडितराज धानुरे हे साक्षीदार आहेत. माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले.
जालना विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांना सावता परिषद आणि समता परिषदेच्या बैठकीत पाठींबा देण्यात आला. गोरंट्याल यांना मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. जालना तालुक्यातील १७ गावातील सावता आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जालना येथील प्रचार कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी आमदार शकुंतला शर्मा, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुषमा खरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी मनोगत व्यक्त करीत गोरंट्याल यांना विजयी करण्याचा निर्धार केला.
बैठकीस नितीन इंगळे, सुभाष गिराम, एकनाथ घोलप, राम गिराम, बबलू बडदे, एकनाथ राऊत, दिलीप गिराम, गणेश खरात, गणेश तिडके, गजानन खरात, अरुण घडलिंग, गोविंद खरात यांच्यासह सावता परिषद, समता परिषदेसह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन डॉ. विशाल धानुरे यांनी केले.