लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शहरातील नवीन बाजार पट्टी भागात राहणाऱ्या संदीप मनोहर हिवाळे (३०) या तरूणाला गेल्या आठ दिवसांपूर्वी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी वाताचे इंजेक्शन दिले होते. यानंतर या तरुणास त्याचे इन्फेक्शन होऊन त्याचा संपूर्ण हात पूर्णपणे चिरून निघाला आहे. हा तरुण सध्या औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप संदीप हिवाळे या तरूणाने केला आहे.संदीप मनोहर हिवाळे यास १५ दिवसांपूर्वी काम करताना दाढीला लोखंडाचा किरकोळ मार लागला होता. त्यानंतर संदीप हा तातडीने उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये गेला. तेथे डॉक्टरांनी त्याला तात्पुरते सलाईन दिले. गोळ््या दिल्या. त्यावरच डॉक्टरांनी त्याचे समाधान केले. मात्र, त्याला काहीच फरक पडला नसल्यामुळे तो पुन्हा आठ दिवसानंतर ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी गेला. यावेळी वाताचे इंजेक्शन देण्यात आले. यानंतर त्याला इंजेक्शनचे इन्फेक्शन होऊन हात फुगून गेला. यानंतर ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांनी उपचार घेण्यासाठी औरंगाबाद येथे संदीपला पाठविले आहे. येथे डॉक्टरांनी सदर इन्फेक्शन हे वाताच्या इंजेक्शनमुळेच झाल्याचे सांगितले. यामुळे ग्रामीण रूग्णालयातील निष्क्रिय डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप याच्या नातेवाइकांनी केली आहे. डॉक्टरांनी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे माझ्या हाताला दुखापत झाली आहे. वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी संदीप हिवाळे यांनी केली आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा हात निकामी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:32 AM