तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत २५ तरुणांनी व्यवसायासाठी कर्ज मागणीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र, अद्यापही तरुणांना व्यवसायासाठी कर्ज मिळालेले नाही.
मराठा तरुणांना व्यवसायासाठी राज्य सरकारकडून अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत अर्थसाहाय्य केले जाते. यासाठी तळणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे २५ तरुणांनी कर्ज मागणीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज वाटप होत नसल्याने निराश झालेल्या तरुणांवर बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांकडे तरुणांनी कर्ज मागणीसाठी प्रस्ताव दिलेले असून, बँकेकडून कर्ज वाटप होत नसल्याने तरुणांची हेळसांड होत असून, वेळीच याकडे लक्ष देण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा सिद्धेश्वर काकडे यांनी दिला आहे.
तळणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी बुधवंत म्हणाले, अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत कर्जासाठी २५ तरुणांनी कर्ज प्रस्ताव दाखल केले आहेत.