युवक काँग्रेसची तहसीलसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:25 AM2019-10-31T01:25:32+5:302019-10-31T01:25:48+5:30
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी चक्क तहसीलदारांच्या वाहनावर कोंब आलेली मक्याची कणसं भिरकावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, तालुका अध्यक्ष त्र्यंबक पाबळे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी चक्क तहसीलदारांच्या वाहनावर कोंब आलेली मक्याची कणसं भिरकावली.
या घटनेमुळे काही काळ उपविभागीय कार्यालय परिसरात गोंंधळ उडाला होता़ परतीच्या पावसामुळे शेतकºयाच्या तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. आद्याप प्रशासनाच्या वतीने कोणताही अधिकारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शेतावर आला नाही. केवळ आॅनलाईन प्रस्ताव भरणे, दंवड्या पिटणे ही कामे करण्यात सरकार व्यस्त आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणताही अधिकारी फिरकला नाही.
ते सर्व दिवाळीचा सण साजरा करण्यात मग्न झाले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे तो हवालदिल झाला आहे.
दिवाळीचा सण शेतक-यांना साजरा करता आला नसल्याची वस्तुस्थिती आहे.
मात्र, प्रशासनाला याचे कोणतेही देणेघेणे नाही, असे एक ना अनेक आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर कोंब आलेले धान्य तहसीलदारांच्या गाडीवर ठेवून आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष त्र्यंबक पाबळे, महेश दसपुते, संतोष ठाकरे, झहिर शेख, अनिल शिंदे, गंगाधर ठोके, असलम पठाण, प्रकश जाधव, यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.