लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच पार पडली असून, जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल देशमुख यांची निवड झाल्याची घोषणा युवक काँग्रेस निवडणूक निर्णय अधिकारी अनिरूद्ध मीना यांनी गुरूवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केली.जालना जिल्हा युवक काँग्रेसची दोन दिवसीय निवडणूक पार पडली. या दोन दिवसामध्ये जिल्ह्यातील युवक पदाधिकाºयांनी आपआपल्या भागामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती. या निवडणुकीचा निकाल गुरूवारी निवडणुक निर्णय अधिकारी अनिरूद्ध मिना यांनी जाहीर केला.या निवडणुकीत जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून परतूर येथील इब्राहिम कायमखानी, जालना शहरातील शेषराव जाधव, रवींद्र गाढेकर, सतीश गोरे यांची निवड झाली आहे. तर जालना विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून देवराव डोंगरे, शेख सईद, नवीद अख्तार यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.बदनापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून सेलगाव येथील जावेद बेग यांची निवड करण्यात आली आहे. भोकरदन विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जुनेद खान (जाफ्राबाद) यांची निवड झाली आहे तर महेश दसपुते यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे. घनसावंगी विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अश्विनी सातपुते यांची निवड झाली आहे तर कैलास कोरडे यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे. परतूर विधानसभा युवक काँग्रस अध्यक्षपदी सुरेश वाहुळे यांची निवड झाली आहे. युवक काँग्रेस निवडणुकीची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू होती. या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे.युवक काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिका-यांचा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या निवास्थानी शाल आणि पुष्पहाराने जोरदार स्वागत केले. याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, युवक काँग्रेसचे मावळते अध्यक्ष अॅड.संजय खडके, मंठा तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, वैभव उगले, शिवराज जाधव, ईरशाद कुरेशी, मोहन इंगळे, जाफराबाद अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष जहीर खान, सय्यद खालेद, राज महंमद, जितेंद्र गाढेकर, मो. इब्रान, सलीम मणियार, शेख कलीम, अन्नू भाई, शेख अजीम, गोपाल चित्राल, सागर ढक्का आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान या झालेल्या निवडीबद्दल पदाधिका-यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.