लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात आठही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आतापासून पिण्याचे पाणी, जनावरांचा चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने काय तयारी केली. यावरुन सर्व सदस्यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. याप्रसंगी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह सर्व सदस्यांची उपस्थिती होती.या सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी करण्यात आली. परंतु, सदस्य जयमंगल जाधव यांनी याला विरोध केला. ते म्हणाले की, जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तो पर्यंत कुठलाही ठराव संमत करता येणार नाही.यानंतर त्यांनी पाणी टंचाई संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, घनसावंगी तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तरीही अधिकाºयांनी या गावांमध्ये पाण्याचे टँकर पाठवले नाहीत. जिल्ह्यात सध्या फक्त ३५ टँकर चालू आहे. ज्या गावांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यांना त्वरित टँकर का दिले जात नाही. त्याचबरोबर कृती आराखडा तयार करतांना कोणत्याही अधिकाºयाने संबंधित सदस्यांना विचारात घेतले नसल्यानेच आज काही गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे सर्व सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. या मुद्यावरुन मोठा गोंधळ उडाला.यावर उत्तर देताना अध्यक्ष खोतकर म्हणाले की, १२ कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. आपण सदस्यांना विचारात घेऊन पुन्हा टँकरची मागणी जिल्हाधिका-यांकडे करु. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये ज्या गावांना टँकरची गरज आहे. त्यांना त्वरीत टँकर उपलब्ध करुन देण्यात येईल.सभेत दुष्काळी नियोजनांचा मुद्दा अनेक सदस्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, जिल्ह््यात दुष्काळी परिस्थिती आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जिल्ह््यात आढावा बैठक घेतली. कृषी व पशु संवर्धन अधिकाºयांना उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. परंतु, अधिका-यांनी अद्यापही काहीच केले नाही. सध्या आपल्याला पाणी, हाताला काम, जनावरांच्या चा-यांचा प्रश्न यावर त्वरित उपाय योजना करण्याची गरज आहे. अधिका-यांनी येत्या आठ दिवसांत उपाय योजना करुन दुष्काळाला तोंड देण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले.मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व अधिकारी सदस्यांना वेळ देत नसल्याच्या मुद्यावरुन भाजप सदस्य आक्रमक झाले. सदस्य अवधुत खडके हे मुख्य कार्यकारी अधिका-यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु, सीईओंनी त्यांची भेट घेतली नाही. आम्ही सर्वसामान्याच्या कामासाठी ग्रामीण भागातून येतो. परंतु, एकही अधिकारी भेटत नाही. त्यामुळे सदस्यांनी कोणाला भेटायचे ? असा प्रश्न भाजपच्या सदस्यांनी उपस्थित केला. यावरुन सभेत मोठा गोंधळ झाला.अधिकारी, सदस्यांमध्ये वादावादीपरतूर पंचायत समितीच्या सभापती शीतल तनपुरे यांचे पती हे उपमुख्य अधिकारी अशोक खरात यांच्याकडे प्रशासकीय कामकाजासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी चुकीच्या पध्दतीने वागणूक दिल्याचा आरोप शीतल तनपुरे यांनी केला. यावरून जि.प. सदस्य महेंद्र पवार यांनी आक्रमक होत खरात यांना धारेवर धरून त्यांच्या अंगावर धावून गेल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
जि.प. सभेत दुष्काळाचा मुद्दा ऐरणीवर..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:29 AM