शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘झेडपी’त एकमताने अर्थसंकल्प मंजूर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:39 AM

जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ४६ हजार ७९७ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ४६ हजार ७९७ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी योजनांच्या आर्थिक तरतुदीत दुरुस्ती करण्याच्या सूचना करून सर्वमताने हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, सभापती सुमनताई घुगे आदींची उपस्थिती होती. सभेत सन २०१७-१८ चा सुधारित अर्थसंकल्प सभेसमोर ठेवण्यात आला असता, त्यावर सदस्यांनी सूचना केल्या. ज्या योजनांसाठी मूळ अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली नव्हती, त्यासाठी सुधारित अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.महसुली उत्पन्नात जमीन महसूल, मुद्रांक व नोंदणी शुल्क, व्याजाच्या जमा रकमा, सार्वजनिक मालमत्तेपासून उत्पन्न, आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मत्स्य व्यवसायाचा ठेका, वन महसूल अनुदान, कृषी, अभिकरण आकार व इतर जमा, पाणीपट्टी कर या बाबींचा समावेश असून, त्याद्वारे ३९ कोटी ५४ लाख २० हजार ३९७ रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.तर विविध योजनांच्या अंमलबजावणीत जसे की, सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, अनु. जाती, जमाती व इतर दुर्बल घटकांच्या कल्याणकारी योजना, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट पालन, पंचायतराज कार्यक्रम, लहान पाटबंधारे, रस्ते, व्यपगत ठेवी यासाठी ३९ कोटी ५३ लाख ७३ हजार ६०० रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. यंदाचा ४६ हजार ७९७ रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प सर्वपक्षीय सदस्यांच्या सर्वमताने मंजूर करण्यात आला.या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी अत्यल्प तरतूद करण्यात आली आहे. सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात १ कोटी ४५ लाख २५ हजार एवढी तरतूद करण्यात आली होती. त्यात यंदा वाढ करण्यात आली असून, ४ कोटी २ लाख ७७ हजार रुपये शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावरुन अधोरेखित होते.४कृषीसाठीची तरतूद मात्र यावेळी कमी करण्यात आली आहे. गतवर्षी ती २ कोटी ६९ लाख ३० हजार रुपये होती. त्यात वाढ करण्याऐवजी २ कोटी १० लाख १५ हजार अशी कमी तरतूद करण्यात आली आहे. कृषी विकासाच्या बाबतीत एवढी कमी तरतूद करण्यात आल्याने सभागृहात विरोधी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.