शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

निंभोरा औद्यगिक वसाहतीसाठी भूसंपादनापोटी दीड कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2023 2:54 PM

भडगाव तालुक्यात ७७ हेक्टरवर होणार एमआयडीसी.

कुंदन पाटील, जळगाव : निंभोरा (भडगाव) येथील नियोजित औद्यगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळाने १ कोटी ६८ लाख१५ हजारांच्या रकमेला मंजुरी दिली आहे. ही रक्कम बुधवारी बॅंक खात्यात वर्गही करण्यात आली आहे.

निंभोरा येथे औद्यगिक वसाहत उभारण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेसाठी २२.३६ हेक्टर खासगी तर ५५.३० हेक्टर सरकारी क्षेत्रावर भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.  संपादनापोटी २२.२६ हेक्टर खासगी कृषी क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तातडीने राबविण्यासाठी कृषी मुल्यांकनानुसार महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळाने १ कोटी ६८ लाख १५ हजारांच्या रक्कम बॅंक खात्यात वर्ग केली आहे.निंभोऱ्यातील गट क्रमांक १७३/२, १७७ व २३७ या क्षेत्रावर औद्यगिक वसाहत उभारली जाणार आहे. मुल्यांकनानुसार रक्कम अदा केल्याने संबंधित शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे. त्यानुसार औद्यगिक विकास महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना ही प्रक्रिया राबविण्यासाठी एक पत्र दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसुल शाखा व  भडगाव तहसीलदारांना यासंदर्भात प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

भूसंपादनाची प्रक्रिया राबविल्यानंतर संबंधित क्षेत्र औद्यगिक विकास महामंडळाकडे सपूर्द करण्यात येणार आहे. त्यामुळे निंभोरा परिसरात उद्योगांना चालना मिळणार असून रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.

टॅग्स :MIDCएमआयडीसी