शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

1 वेळा पेरणी 2 वेळा उत्पादन

By admin | Published: April 25, 2017 2:13 PM

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सुखदेव गिरधर भोई या शेतक:याने सात एकर क्षेत्रात 60 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले.

 नंदुरबार, दि.25- शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सुखदेव गिरधर भोई या शेतक:याने सात एकर क्षेत्रात 60 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. एक वेळा पेरणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा 55 ते 60 क्विंटलर्पयत उत्पन्न मिळत असल्याने दोन वेळा उत्पादन शेतक:याला मिळणार आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये 15 जून 2016  रोजी सात एकर क्षेत्रात तूर पिकाची पेरणी केली होती.

उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी या शेतक:याने पुन्हा त्या पिकाला पाणी दिले. दोन वेळा फवारणी केली. खत टाकले आणि आता पुन्हा बहर आला आहे व शेंगाही लागत आहेत. आता पुढील एप्रिल महिन्याच्या शेवटर्पयत या पिकाची काढणी होईल. तेव्हा पुन्हा 55 ते 60 क्विंटल तूर येईल, अशी सुखदेव भोई यांना अपेक्षा आहे. म्हणजेच  ‘पेरणी एक वेळा, उत्पन्न दोन वेळा’ असे प्रत्यक्षात होणार आहे.
 
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ाला शेतक:याने पूर्ण पिकांच्या झाडांची तोडणी न करता फक्त शेंगा तोडल्या. सात दिवसांत सर्व शेंगांची तोडणी झाली. ते खळ्यात आणून मशीनद्वारे दाणे काढले तर त्यांना सात एकरमध्ये 60 क्विंटल उत्पन्न निघाले.
 
एकरी दोन माणसे याप्रमाणे 14 मजुरांनी सात एकर शेतात तीन दिवसांत तूर दाणे टोचले अर्थात पेरणी केली. त्यानंतर कूपनलिकेचे पाणी भरले. त्यातच पावसाचे पाणी मिळाले. अधून-मधून शेणखत, सेंद्रिय खत, युरिया टाकण्यात आला.
 
डिसेंबर-जानेवारीतच तुरीची झाडे पाच ते सात फुटांर्पयत वाढली. लागवड करताना प्रमाण समान ठेवल्याने पीकही बहारदार झाले. चारीत पाच फुटांचे अंतर तर दोघा पिकांतील अंतर एक फूट ठेवले होते.
सूर्यप्रकाश व पुरेसे पाणी  मिळाल्याने या पिकाची झाडे सहा ते सात फूट वाढली. फुलांचा बहरही येऊन शेंगाही खूप लागल्या. यामुळे परिसरातील शेतकरी पीक पाहण्यासाठी गर्दी करू लागले.