शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

ठेकेदारास एक कोटी ४० लाखांची दंडाची नोटीस

By admin | Published: March 23, 2017 12:19 AM

अवैद्य वाळू वाहतूक : रॉयल्टी नाही

अमळनेर : शासकीय कामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता आणि रॉयल्टी न भरता ५०० ब्रास वाळू वाहतूक करणाºया सुनील भास्कर पाटील (जळगाव) या ठेकेदारास १ कोटी ३९ लाख ७० हजार रुपये दंडाची नोटीस तहसीलदार प्रदीप पाटील यांनी बजावली आहे.तासखेडे येथील अभिमन नागो पाटील हे विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरवर अवैध वाळू वाहतूक सुनील पाटील यांनी घेतलेल्या शासकीय कामासाठी करत असल्याचे आढळून आले.  वाळू या गौण खनिजाचा लिलाव झाल्याशिवाय कोणत्याही नदीपात्रातील वाळू वाहतूक करता  येत नाही. शासकीय ठेकेदारांनाही वाळू लिलाव मंजूर झालेल्या लिलावधारकाकडूनच वाळू विकत घ्यावी लागते. मात्र पाटील यांनी  कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता वाळू उत्खनन केल्याचे नोटिसीत म्हटले आहे. प्रती ब्रास २५ हजार रुपये दंडाप्रमाणे सव्वा  कोटी रुपये आणि रॉयल्टीची रक्कम २ लाख रुपये तसेच खनिज विकास १० टक्के निधी १२ लाख ७० हजार रुपये अशी एकूण १ कोटी ३९ लाख ७० हजार रुपये दंडाची  कार्यवाही का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. याचा खुलासा तीन दिवसात मागविण्यात आलेला आहे. महसूल प्रशासनाने दिलेल्या या दंडात्मक कारवाईच्या नोटिसीमुळे अवैध वाळू उत्खनन करणाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.